आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप सरकारचा यू टर्न; गड, किल्ले संवर्धनासाठी समिती गठित करणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील पर्यटन वाढावे यासाठी वर्ग दाेनच्या गड-किल्ल्यांचा खासगी विकासकांच्या माध्यमातून विकास करण्याच्या निर्णय फडणवीस सरकारने घेतला हाेता. मात्र या निर्णयावर टीकेची झाेड उठल्यानंतर सरकारकडून आता निर्णयात बदल करून किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मंत्रीस्तरीय उच्चाधिकार समिती गठित करण्याचे जाहीर करण्यात आले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील गडकोटांचा विकास करण्याची  एक योजना बनवली होती. राज्यातील वर्ग २ मधील कोटांचा व दुर्गांचा त्यात समावेश होता. त्यासाठी खासगी विकासकांची मदत घेण्यात येणार होती. तसेच विकास केलेले किल्ले कार्यक्रमासाठी भाड्याने दिले जाणार होते. तसा मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यावर सर्व स्तरांतून चौफेर टीका झाली. त्यानंतर सरकार बॅकफूटवर गेले. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या निर्णयात आता सुधारणा करण्यात येणार आहे. पर्यटन विभागाच्या योजनेचा फेरविचार करण्यासाठी मंत्रिमंडळ सदस्यांची एक उच्चाधिकार समिती गठित करण्यात येणार आहे. तो निर्णय या आठवड्यात होणाऱ्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करून घेतला जाणार आहे.