Home | Business | Business Special | Uber Is Launching the World’s First Submarine Ride

आता पर्यटकांना पाहता येणार समुद्राच्या तळातील सौंदर्य, उबरने लॉन्च केली पहिली सबमरिन राइडसेवा

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 25, 2019, 04:29 PM IST

यामध्ये बसण्यासाठी दोन लोकांना लागेल इतके भाडे

 • Uber Is Launching the World’s First Submarine Ride

  नवी दिल्ली - जगभर भ्रमंती करणाऱ्या पर्यटकांसाठी ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरिअर रीफचा प्रवास करणे एखाद्या स्वप्नासारखे असते. त्यामुळे प्रवाशांच्या हा छंद पूर्ण करण्यासाठी आता एक पाणबुडी तयार करण्यात आली आहे. त्यासाठी क्वीनस्लँड ऑस्ट्रेलियाने उबरसोबत पार्टनरशिपची घोषणा करून ही 'स्क्यूबर' नावाची पाणबुडी लॉन्च केली आहे. ही राइडशेअर सबमरीन सोमवार 27 मे रोजी ग्रेट बॅरियर रीफ मध्ये दाखल होणार आहे. तसेच ही जगातील पहिली अशी पाणबुडी आहे ज्यामध्ये सामान्य नागरिकाला प्रवास करता येणार आहे. आयुष्यात एकदा तरी पाणबुडीमध्ये बसण्याचे तुमचे स्वप्न असेल तर आपण ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी विमानाचे तिकिट बुक करा.


  2 प्रवाशांसाठी 2000 डॉलर भाडे
  एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, यामध्ये प्रवाशांना चांगला अनुभव मिळण्याचा दावा स्क्यूबरने केला आहे. पाणबुडीमध्ये बसून लोकांना पाण्याखालून जाताना एक वेगळाच आनंद मिळेल. हा प्रवास हेरॉन बेटावरून सुरू होणार आहे. ही पाणबूडी 27 मे ते 9 जूनपर्यंत अनेक बेटांना भेट देईल. या सबमरिनमध्ये बसण्यासाठी 2 लोकांसाठी 2000 डॉलर (1,38,750 रुपये) दर आकारण्यात येईल. आईलँडपर्यंत पोहचण्यासाठी आपल्या लोकेशनवरून उबर कॅब बुक करावी लागेल, याचे भाडे आपण दिलेल्या किरायामध्ये समाविष्ट असेल. पाणबुडीची ही सवारी एक तासाची असणार आहे. त्यानंतर प्रवाशांना हेरॉन बेटावर किंवा पोर्ट डगलसपर्यंत हॅलिकॉप्टरद्वारे सोडण्यात येईल तेथून पुढे उबर कॅबने आपल्या पिकअप अॅड्रेसवर सोडण्यात येईल.

  उबरसोबत भागीदारी करण्यासाठी उत्सुक- कोडरिंगटन

  2018 च्या शेवटी, ग्राहक संशोधन विभागाला कळाले होते की, पाणबुडीमध्ये ग्रेट बॅरियर रीफचा शोध घेणे भविष्यातील प्रवासाचा सर्वात महत्वाचा अनुभव होता. पर्यटन आणि क्वींसलँडचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लीन कोडिंगटन यांनी सांगितले की, स्क्यूबरमुळे ही इच्छा सत्यात उतरली आहे. त्यामुळे क्वींसलँड पर्यटनासाठी खूप महत्वाचे पाऊल ठरणार आहे. तसेच अभ्यांगासाठी निसर्गाचे नवीन चमत्काराची माहिती मिळवण्यासाठी योग्य मार्ग दाखवते. आम्ही या अनूभवाद्वारे रीफच्या सौंदर्याचे प्रदर्शन करण्यासाठी उबरसोबत भागीदारी करीत आहोत.

Trending