तंत्र प्रयोगामुळेही ढळू शकते मानसिक संतुलन

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 25, 2011, 12:44 PM IST

काही गुप्त विद्यांचा उपयोग मात्र दुसऱ्याचे अहित करण्यासाठी केला जातो.

  • uchchatan-karma

    तंत्र मंत्रांमध्ये काही गुप्त विद्या असतात. या गुप्त विद्यांचा उपयोग साधक आपल्या मनोकामनांच्या पूर्तीसाठी करतो. काही गुप्त विद्यांचा उपयोग मात्र दुसऱ्याचे अहित करण्यासाठी केला जातो. मोहन कर्म, आकर्षण कर्म, स्तंभन कर्म आदी प्रकार त्यात आहेत. उच्चाटन कर्मही यातलाच एक प्रकार. ज्या तोटक्याने एखाद्या व्यक्तिच्या मनाची स्थिरता ढळते, त्या तंत्रप्रकाराला उच्चाटन कर्म म्हणतात.
    या तोटक्यामुळे मानसिक स्थिरता नष्ट होते. याचा प्रयोग ज्याच्यावर झाला आहे त्याच्या मनात भ्रम, भय, अविश्वास, अनामिक भीती निर्माण होते. त्याला कोणतेही काम धड करता येत नाही. असा माणूस एका ठिकाणी अधिक काळ बसूही शकत नाही. त्याच्या मनात विचारांची गर्दी होते.
    उच्चाटन कर्म खूपच अनिष्टकारी आहे. हा प्रयोग करताना काही त्रुटी राहिली तर त्याचा दुष्प्रभाव साधकावरसुद्धा होऊ शकतो.

Trending