आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्स गर्लफ्रेंडच्या आठवणीत भावुक झाला उदय चोप्रा, म्हणाला- 'तिच्यावरील प्रेमाने जिंवत असल्याची जाणिव व्हायची'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: उद्य चोप्रा दिर्घकाळापासून चित्रपटांपासून दूर आहे. त्याने एक ट्विट केले आहे, जे त्याची एक्स गर्लफ्रेंड नरगिस फखरीकडे इशारा करते. त्याने काहीच नाव न लिहिता एक भावनिक संदेश लिहिला आहे. त्याने ट्विटरवर लिहिले की, 'काही वर्षांपुर्वी मी ज्या इंटेंसिटीने प्रेम करायचो, तसेच प्रेम करु शकलो असतो तर...ती एक अशी मुलगी होती, ज्यावर फक्त प्रेम करुन मला जिवंत असल्याची जाणिव व्हायची. मी तिला गमावले आहे. मला फक्त आता ते पॅशन हवे आहे. कदाचित मला तिची गरज आहे.'


चोप्रा मेंशनमध्ये राहिली होती नरगिस 
उदय चोप्रा आणि त्याची आई पामेला चोप्रासोबत नरगिस त्यांच्या घरात राहिली. रिपोर्ट्सनुसार या दोघांचे कुटूंबिय लग्नासाठी तयारही झाले होते. नरगिस जेव्हा मुंबईमध्ये राहायची तेव्हा ती उदय आणि पामेलासोबत त्यांच्या घरी राहायची. एवढेच नाही तर घरातील लोक नरगिसला भाभी म्हणून हाक मारायचे. परंतू याच वर्षी एप्रिलमध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. 

- उदय चोप्रासोबत ब्रेकअप केल्यानंतर नरगिसने अमेरिकन डायरेक्टर मॅट अलोंजोसोबत नाते जोडले.

 

2013 नंतर कोणत्याच चित्रपटात दिसला नाही 
उदय चोप्राने असिस्टंट डायरेक्टर म्हणून 1991 मध्ये आलेल्या 'लम्हे' चित्रपटातून आपले करिअर सुरु केले होते. काही चित्रपटांमध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केल्यानंतर त्याने 'मोहब्बतें' (2000) चित्रपटातून अभिनयास सुरुवात केली. त्याने 'मेरे यार की शादी है' (2002), 'धूम' (2004), 'नील एंड निक्की' (2005), 'धूम 2' (2006), 'धूम 3' (2013) सोबतच काही चित्रपटांमध्ये काम केले. तो शेवटच्यावेळी धूम 3 मध्ये दिसला होता. 

 

2012 मध्ये सुरु केली आपली कंपनी 
उदय चोप्राने 2012 मध्ये आपली योमिक कंपनी सुरु केली. तो यशराज फिल्म्सचा मॅनेजरही आहे. त्याने 2014 मध्ये 'ग्रेस ऑफ मोनाको' आणि 'द लॉन्गेस्ट वीक' चित्रपट प्रोड्यूस केला आहे. या चित्रपटांच्या माध्यमातून यशराज एंन्टटेन्मेंटने हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. उदय, हा दिवंगत यश चोप्रा यांचा मुलगा आणि प्रोड्यूसर-डायरेक्टर आदित्य चोप्राचा लहान भाऊ आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...