आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम मिळत नसल्यामुळे डिप्रेशनमध्ये आहे राणी मुखर्जीचा दीर उदय चोप्रा, सोशल मीडियावर लिहिले, 'मी ठीक नाहीये', आत्महत्येचेही बोलला 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : राणी मुखर्जीच दीर आणि आदित्य चोप्रा यांचा भाऊ उदय चोप्रा याच्याबद्दल एक खळबळजनक बातमी आली आहे. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आत्महत्या करण्याबद्दल लिहिले आणि आणि नंतर ते लगेच डिलीटसुद्धा केले. उदयने एका पोस्टमध्ये हे मान्य केले की, तो ठीक नाहीये आणि तो सतत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याला यश मिळत नाहीये. रिपोर्ट्सनुसार, असे सांगितले जात आहे की, 6 वर्षांपासून उदय चोप्राजवळ एकही  काम नाही, ज्यामुळे तो डिप्रेशनचा शिकार झाला आहे. 

उदयने ट्विटरवर लिहिल्या दोन पोस्ट...
उदय चोप्राने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, त्याने काही तासांसाठी आपले ट्विटर अकाउंट डी-एक्टिवेट केले होते आणि त्याला असे वाटू लागले होते की, तो मारत आहे. त्यानंतर त्याने लिहिले की, असे वाटते आत्महत्या करण्याचा हा चांगला ऑप्शन आहे आणि लवकरच तो हे नेहमीसाठीही करू शकतो. एवढे सगळे वाचल्यानांतर यूजर्स हैराण झाले आणि सोशल मीडियावर खळबळ सुरु झाली. मात्र या पोस्टबद्दल उदय चोप्राने अद्याप कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही. 

2013 मध्ये 'धूम 3' या चित्रपटांत दिसला होता उदय... 
उदय चोप्रा 2013 मध्ये आमिर खान स्टारर फिल्म 'धूम 3' मध्ये दिसला होता. या फिल्ममध्ये अभिषेक बच्चन आणि कतरिना कैफ हेदेखील होते. त्यानंतर तो कोणत्याही चित्रपटांत दिसला नाही.