आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख-अमिताभच्या सुपरहिट चित्रपटातून या 5 स्टार्सनी केले होते पदार्पण, आता कुणी रमले संसारात तर कुणी करत आहे नोकरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  दिग्दर्शक आदित्य चोप्रांच्या सुपरहिट 'मोहब्बतें' या चित्रपटाच्या रिलीजला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय स्टारर हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2000 रोजी रिलीज झाला होता.  अमिताभ बच्चन यांच्या उतरत्या करिअरला या चित्रपटाने पुन्हा एकदा रुळावर आणले होते. याच चित्रपटातून एक दोन नव्हे तर तब्बल पाच नवोदितांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. पण या पाच जणांपैकी कुणीही पुढे करिअरमध्ये हिट होऊ शकले नाही. दीर्घकाळापासून हे सेलेब्स स्क्रिनवर झळकलेले नाहीत. आज या सेलेब्सविषयी जाणून घेऊयात...

 

यशस्वी मॉडेल पण फ्लॉप अॅक्ट्रेस
यशस्वी मॉडेल राहिलेली प्रीती झांगियानी हिने 'मोहब्बतें' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटातील तीन न्यूकमर्स अभिनेत्रींपैकी ती एक होती. तिच्या भूमिकेचे कौतूक झाले होते. त्यामुळे तिला चित्रपटांच्या ऑफर्सही मिळाल्या. पण चुकीच्या चित्रपटांच्या निवडीमुळे प्रीतीच्या करिअरला डाऊन फॉल आला. 2008 मध्ये तिने बॉयफ्रेंड प्रवीण डबाससोबत लग्न केले आणि बॉलिवूडला अलविदा म्हटले. प्रीती आता दोन मुलांची आई असून संसारात रमते.

 

- शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण शमिता शेट्टी हिने 'मोहब्बतें'द्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता. तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. पण इतरांप्रमाणे शमिताही हे यश टिकवू शकली नाही. 'वजह', 'फरेब', 'बेवफा' आणि 'अग्निपंख' हे फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर शमिताने 2011 मध्ये बॉलिवूडमध्ये सन्यांस घेतला आणि इंटेरिअर डिझायनर म्हणून करिअरला सुरुवात केली. छोट्या पडद्यावर ती 'बिग बॉस' आणि 'झलक दिखला जा' या शोजमध्ये सहभागी झाली होती. 

 

चित्रपटांपासून दूर अभिनेत्याला करतेय डेट... 
एका टीव्ही कमर्शिअलमधून मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवणा-या किम शर्माने 'मोहब्बतें'द्वारे डेब्यू केला होता. त्यानंतर ती 'तुमसे अच्छा कौन है', 'कहता है दिल बार बार' आणि 'फिदा' या चित्रपटांमध्ये झळकली. पण तिचेही करिअर यशस्वी होऊ शकले नाही. चित्रपटांपेक्षा ती क्रिकेटर यूवराज सिंगसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत राहिली. 2011 मध्ये किमने चित्रपटसृष्टी सोडली आणि केन्याचा बिझनेसमन अली पंजानीसोबत लग्न केले. आता मात्र तिचा घटस्फोट झाला असून ती सध्या 'पलटन' या चित्रपटात झळकलेला अभिनेता हर्षवर्धन राणेला डेट करत आहे.

 

- यश चोप्रा यांचा धाकटा मुलगा आणि आदित्य चोप्राचा भाऊ उदय चोप्रानेही याच चित्रपटातून अभिनय करिअरची सुरुवात केली होती. पण या चित्रपटानंतर त्याला सोलो अॅक्टरच्या रुपात जास्त यश मिळाले नाही.  त्याने ब-याच चित्रपटात सहायक अभिनेता म्हणून काम केले. 2004 मध्ये रिलीज झालेल्या 'धूम' या चित्रपटातून तो सुपरहिट चित्रपटाच्या सीरिजचा महत्त्वाचा भाग बनला. पण गेल्या पाच वर्षांपासून उदय मोठ्या पडद्यापासून दूर आहे. 

 

धर्मा प्रॉडक्शनमध्ये करतोय नोकरी..
'मासूम' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणा-या जुगल हंसराजने 1994 मध्येच अभिनेता म्हणून डेब्यू केले होते. पण त्यावेळी त्याला यश मिळू शकले नव्हते. त्यानंतर त्याने 'मोहब्बतें'मधून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. हा चित्रपट हिट ठरला, पण या यशाचा फारसा फायदा जुगलच्या करिअरला झाला नाही. त्यानंतर जुगलने अभिनय सोडून दिग्दर्शन क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. त्याने यशराज बॅनरच्या 'रोडसाइट रोमियो' (एनिमेटेड) आणि 'प्यार इंपासिबल' हे चित्रपट दिग्दर्शित केले. तो सध्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये क्रिएटिव्ह डेव्हलपमेंट हेड या पदावर कार्यरत आहे. 

बातम्या आणखी आहेत...