आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम समाजाची उदयनराजे भोसले यांनी मागितली माफी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या सांगता सभेत भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य चुकीचे आहे. या वक्तव्याशी आपला संबंध नाही. पण तरीही आपण मुस्लिम समाजाची माफी मागत आहोत. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने चालतो. जातपात आपण कधीच मानत नाही, अशी स्पष्टोक्ती माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी देत 'मी सॉरी म्हणायला या ठिकाणी आलो आहे. माझी तुम्हाला शपथ आहे, असा कोणी करणारा असेल तर त्याला खाली खेचा आणि ठेचा, पण माझ्यावरती त्याचे गालबोट नको,' असे वादग्रस्त वक्तव्यही या वेळी उदयनराजे यांनी केले.


कराडचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाका परिसराची उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली. तत्पूर्वी राजेंद्रसिंह यादव यांच्यासह कराडच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत उदयनराजे यांनी येथील हॉटेल पंकजवर मुस्लिम समाजाशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी मुस्लिम समाजाची माफी मागितली.


उदयनराजे म्हणाले, कराडच्या सांगता सभेस आपण नव्हतो. आपण असतो तर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यास आपण खाली खेचले असते. आपण कधीच जात-धर्म मानत नाही, असे सांगत विक्रम पावसकर यांनी तसे वक्तव्य करायला नको होते, असेही उदयनराजे यांनी सांगितले.

माफी मागतानासुद्धा यांना लाज वाटते
माफी मागतानासुद्धा यांना लाज वाटते. जे मी केले नाही, दुसऱ्याने केले, तरीही मी माफी मागतो. त्यांचा मथितार्थ एवढाच की, समाज एकत्र राहायला हवा. भाजप जिल्हाध्यक्ष माझ्या प्रचारात नव्हते, सांगता सभेत त्यांनी माझ्या प्रचारात येऊन सर्व कामावर विरजण टाकले. मी त्या सभेत असतो तर सभेतून खाली खेचले असते, असेही ते म्हणाले.
 

बातम्या आणखी आहेत...