आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उदयनराजेंची जीभ घसरली, मुलीच्या प्रश्नावर दिले 'भलतेच' उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सातारा - यंदाच्या लोकसभा निवडणूकीला तरुण मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थिनीच्या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजेंची जीभ घसरली. 'मुले मुलींकडे नाही पाहणार, तर मग मुलांकडे पाहणार का?' असा उलट प्रश्न करत त्यांनी केला. 

 

साताऱ्यातील कोरेगाव येथील 'डी पी भोसले कॉलेज'मध्ये उदयनराजे आले होते. यावेळी 'मुले आमची छेड काढतात' अशी तक्रार एका विद्यार्थिनीने केली. 'मुले आमचा पाठलाग करतात', 'मागे येत ओव्हरटेक करतात', 'मुली स्टँडवर थांबल्या, की त्यांच्याजवळ गाडी लावून थांबतात', 'त्यांना सारखं बघतात', असा एक ना अनेक तक्रारींचा तिने पाढा वाचला. मात्र उदयनराजेंनी दिलेल्या उत्तरामुळे सर्वांना धक्का बसला. 

 

विद्यार्थिनीला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, 'मला समजत नाहीये की मी काय उत्तर देऊ. पण ही नॅचरल गोष्ट आहे'. आता मुले मुलींकडे पाहणार नाहीत तर काय मुलांकडे पाहतील का?' असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला. पुढे बोलतांना ते म्हणाले की, 'याचा अर्थ असा नाही की त्यांच्यात कोणती विकृती आहे. त्यांच्यात जर विकृती असली तर तुम्ही मला येऊन सांगा. आम्ही जातीने त्याकडे लक्ष देऊ. 

 

उदयनराजेंच उत्तर ऐकून अवाक झालेली युवती काहीच न बोलता खाली बसली. काही विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला तर बहुतांश तरुणांनी उदयनराजेंचा जयजयकार केला.