Satara / काही बरेवाईट झाल्यास शिवेंद्रराजेच जबाबदार; उदयनराजेंचा इशारा

‘जैसी करनी वैसी भरनी’ या न्यायातून कोणालाच सूट मिळत नाही

दिव्य मराठी

Jun 19,2019 09:16:00 AM IST

सातारा - ‘जैसी करनी वैसी भरनी’ या न्यायातून कोणालाच सूट मिळत नाही. आमदार शिवेंद्रराजे आमचे बंधू असले तरी ते याला अपवाद नाहीत. लोकसभेला आमदार शिवेंद्रराजेंनी आमचे कामच केले असल्याने आमच्या दिलेल्या शब्दात फरक पडणार नाही. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात आमचे पाठबळ राहील. त्या भूमिकेत बदल होणार नाही. मात्र, त्यांच्या करणीमुळे जर काही बरेवाईट घडले तर त्यास सर्वस्वी तेच जबाबदार असतील, असा इशारा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून मात्र शिवेंद्रसिंहराजे आणि त्यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

X