आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे, एक-एक करत अनेक मोठे नेते भाजप शिवसेनेत गेले. त्यातच आता विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीला आणखी एख जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करण्याच असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उदयनराजे भोसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. याआधी उदयनराजेंचे बंधू आमदार शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेल्यामुळे उदयनराजे अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.
शिवेंद्रराजे भोसले हे भाजपात गेले आहेत, सत्ता धाऱ्यासोबत असल्यामुळे शिवेंद्रराजे हे सातऱ्यात आणखी मजबूत आणि सक्षम होतील, याची भीती आहे, त्यामुळे उदयनराजे भोसले हे पक्ष बदलण्याच्या विचारात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पूरग्रस्त भागात मदत कशी करायची याची चर्चा मुख्यमंत्री आणि उदयनराजे यांच्यात होईल. याचबरोबर राजकीय चर्चाही या दोघांमध्ये होईल, असे सांगितले जात आहे. शिवेंद्रराजेंनी याआधीच पक्षात प्रवेश केल्यामुळे भाजप उदयनराजेंनाही पक्षात घेणार का? हा मुद्दा आहे. पण उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली तर राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडेल, त्यामुळे भाजप ही संधी सोडण्याची शक्यता कमी आहे.
उदयनराजे भोसले हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही त्यांनी उदयनराजेंनी त्यांचे स्वत:चे वेगळे अस्तित्व ठेवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.