सत्ता संघर्ष / राष्ट्रवादीचे आमदार फुटणार नाहीत, त्यांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केलाय- जितेंद्र आव्हाड

सोशल मीडियावरील व्हायरल मेसेज आव्हाडांनी शेअर केला

दिव्य मराठी वेब टीम

Nov 08,2019 03:48:00 PM IST

मुंबई- राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. यातच आमदारांचा घोडेबाजार होत असल्याचे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या परिस्थितीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चिमटे काढले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आपापल्या घरी आहेत, कारण त्यांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केला आहे, असे ट्वीट आव्हाडांनी केले.

शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना रंगशारदाला बोलावलं असून तिथून सर्व जण एकत्र एखाद्या ठिकाणी रवाना होणार आहेत. तर काँग्रेसचे आमदारही जयपूरला गेल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे आमदार एखाद्या

अज्ञात स्थळी गेल्याचं मात्र कोणतंही वृत्त नाही. त्यामुळे ‘शिवसेना आमदार - रंगशारदा, काँग्रेस आमदार - जयपूर, राष्ट्रवादी आमदार - आपआपल्या घरी, कारण सगळ्यांना उदयन राजेंचा फोटो मेसेज करून ठेवलाय. हा मेसेज करणाऱ्याला सलाम’ असे जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केले. सोशल मीडियावर फॉरवर्ड झालेला मेसेज आव्हाडांनी शेअर केलेला दिसत आहे.

X
COMMENT