आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदुत्वाचे राजकारण : मोदींना हिंदुत्व कळत नसेल तर ते कसले हिंदू? - राहुल, आपल्या धर्माबाबत राहुल द्विधा स्थितीत - सुषमा स्वराज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर - राजस्थानच्या निवडणूक रणांगणात जाती-धर्माचे जोरदार राजकारण सुरू आहे. शनिवारी हिंदुत्वावरून भाजप व काँग्रेस समोरासमोर उभे ठाकले. येथील पत्रकार परिषदेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, हिंदुत्वाचे सार काय आहे? गीतेत काय सांगितले आहे? याचे ज्ञान प्रत्येकाला आहे, प्रत्येक ठिकाणी ते आहे. प्रत्येक जिवंत वस्तूमध्ये ज्ञान आहे. पीएम म्हणतात की, ते हिंदू आहेत मात्र हिंदुत्वाचा पाया त्यांना समजत नाही. ते कसले हिंदू आहेत? जीवनातील सर्व ज्ञान त्यांच्याच डोक्यातून निघते,असे त्यांना वाटते. 

 

भाजपकडून सुषमा स्वराज यांनी उत्तर देत सांगितले की, राहुल उदयपूरला येताच विसरण्याच्या मानसिकतेत आले. प्रथम त्यांनी पद््मावतीऐवजी लक्ष्मीबाईचे नाव घेतले. नंतर पीएमना हिंदुत्वचा अर्थ कळत नसल्याचे म्हटले. काँग्रेस त्यांच्या धर्म-जातीबाबत द्विधा आहे यामुळे त्यांनी असे म्हटले होते. काँग्रेसने राहुल यांची प्रतिमा धर्मनिरपेक्ष नेत्याची तयार केली. मात्र,देशात बहुसंख्य हिंदू असल्याने हिंदूची प्रतिमा तयार केली जात आहे. 

 

शहिदांचा सूड उगवला, तुम्ही अपमान करता : शहा 
राहुल गांधी यांनी सर्जिकल स्ट्राइकवरून मोदींवर निशाणा साधला. उदयपूरमध्ये राहुल म्हणाले, यूपीच्या निवडणुकीत पराभव दिसताच मोदींनी लष्कर संपत्तीचे राजकीय संपत्तीत रूपांतर केले. मनमोहनसिंग सरकारनेही तीन वेळा सर्जिकल स्ट्राइक केला होता. आम्ही सैन्य प्रकरणांत लष्कराचे ऐकतो. यावर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी फलौदीच्या सभेत उत्तर दिले. शहा म्हणाले, पंतप्रधान मोदींनी शहीद जवानांचा सूड उगवला. राहुल म्हणत होते यूपी निवडणूक जिंकण्यासाठी सर्जिकल स्ट्राइक केला. तुम्ही देशातील शहिदांचा अपमान करत आहात. आज सीमेवर तैनात प्रत्येक जवानाच्या हृदयात विश्वास आहे की, माझे सरकार माझ्यामागे पर्वतासारखे उभे आहे. 

 

आपल्या धर्माबाबत राहुल द्विधा स्थितीत : सुषमा स्वराज 
हिंदू असण्याचा अर्थ त्यांना विचारण्याइतपत जानवेधारी ब्राह्मणाचे ज्ञान वाढले ?: सुषमा 
सुषमा स्वराज जयपूरच्या सभेत म्हणाल्या, संसदेत मोठा गाजावाजा करून आणलेल्या अविश्वासदर्शक प्रस्तावावेळी आपण हिंदू असल्याचे संपूर्ण देशाला कळावे यासाठी राहुल गांधीनी ते हिंदू असल्याचे म्हटले होते. मात्र, काँग्रेसला वाटले की केवळ हिंदू असल्याचे सांगून भागणार नाही. श्रद्धा असणारा हिंदू असणे आवश्यक आहे. यानंतर त्यांनी मानसरोवर यात्रा केली व परत आल्यावर शिवभक्त झाले. काँग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरून दतिया पीठाला गेले. नंतर राजस्थानच्या पुष्करमध्ये आले. राहुल शैव, शाक्य व वैष्णवही झाले. यानंतर आलेल्या वक्तव्यात राहुल जानवेधारी ब्राह्मण असल्याचे सांगितले. या जानवेधारी ब्राह्मणाच्या ज्ञानात एवढी वाढ झाली की हिंदू असण्याचा अर्थही त्यांच्याकडून समजून घ्यावा का? मी आगामी लोकसभा लढवणार नसल्याचे म्हटले आहे, मात्र मी राजकीय संन्यास घेणार असल्याचे कधीही म्हटले नाही. सध्या माझी प्रकृती चांगली असल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...