आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीएमपदासाठी उद्धवही मान्य, पण आदित्य नकाे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज्याचे पुढील मुख्यमंत्रीही देवेंद्र फडणवीसच हाेती, असा वारंवार दावा करणाऱ्या रिपाइं अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता भूमिका बदलली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा फडणवीसच मुख्यमंत्री हाेतील. मात्र शिवसेनेच्या जर जास्त जागा आल्या तर उद्धव ठाकरेंचे नेतृत्व आपल्याला मान्य असेल, आदित्य यांचे नव्हे, अशी भूमिका त्यांनी शनिवारी नाशिकमध्ये मांडली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना आठवले म्हणाले, ‘राज ठाकरे यांनी जाहीर सभांमधून सक्षम विराेधी पक्ष हाेण्याची सत्ता आम्हाला द्या, असे आवाहन करत आहेत. मग जर राज ठाकरे यांना विराेधी बाकावरच बसायचे असेल तर त्यांनी आपला पक्ष काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीतच विलीन करावा.’