आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील शिवतीर्थावर भव्य-दिव्य अशा सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहला पार पडला. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी शिवरायांचे आणि जिजामाताचे आशीर्वाद घेऊन मुख्यमंत्री पदाचा पभार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासोबत पुत्र आणि वरळीले आमदार अदित्य ठाकरेही होते. उद्धव यांच्या स्वागतासाठी मंत्रालय सज्ज झालं होतं. यासोबतच शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेतेही उपस्थित होते.
Mumbai: Shiv Sena Chief Uddhav Thackeray takes charge as Maharashtra Chief Minister. pic.twitter.com/Q5D4AcoLOf
— ANI (@ANI) November 29, 2019
पदभार स्वीकारण्यापूर्वी उद्धव ठाकरे हे हुतात्मा स्मारकावर गेले. तिथे त्यांना हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार असल्यामुळे मंत्रालयात सकाळपासून उत्साहाचे वातावरण होते. यासोबतच कडेकोट बंदोबस्त ही होता. मागील एक ते दिड महिन्यांपासून ओसाड पडलेले मंत्रालय आज नव्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी गजबजले होते. यावेळी हजारो शिवसैनिक आपल्या नेत्याला मुख्यमंत्रिपदी विराजमान होताना पाहायला आले होते. महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुरुवारी शपथ घेतली. शिवाजी पार्कवर झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात ठाकरेंपाठाेपाठ सुभाष देसाई, एकनाथ शिंदे (शिवसेना), जयंत पाटील, छगन भुजबळ (राष्ट्रवादी) आणि बाळासाहेब थोरात, नितीन राऊत (काँग्रेस) या सहा मंत्र्यांनाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अनेक दिग्गज नेते उपस्थित हाेते. पंतप्रधान नरेंद्र माेदींनी टि्वटरवरून व काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी यांनी पत्राद्वारे ठाकरेंना शुभेच्छा दिल्या.
कमलनाथ, स्टॅलिन, टी. अार. बालू प्रमुख पाहुणे
सायंकाळी 6.40 वाजता शिवाजी पार्कवर दिमाखदार साेहळा झाला. राज्याच्या कानाकाेपऱ्यातून तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित हाेते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खरगे, अभिषेक मनू सिंघवी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी आदी मंडळी उपस्थित होती.
पहिली कॅबिनेट : रायगडासाठी 20 कोटी
पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात रायगड किल्ला संवर्धनासाठी 20 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. शेतकऱ्यांसाठी आजवर जे केले, नुकसान झाले त्याची माहिती मुख्य सचिवांकडून मागवली आहे. ती आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय लवकरच घेऊ, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. 'मंत्रिमंडळ सर्व विभागांचे असते, ते एखाद्या विभागाचे नसते, हे ज्यांनी मुख्यमंत्रिपद अनुभवले आहे त्यांना माहिती आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रम सर्व राज्याचे हित लक्षात घेऊनच तयार केला आहे,' असे उत्तर त्यांनी फडणवीस यांच्या टीकेला दिले.
बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार हाेणार
3 डिसेंबरपर्यंत या सरकारला बहुमत सिद्ध करायचे अाहे. त्यानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार अाहे. शिवसेना, राष्ट्रवादीला एकूण 15, तर काँग्रेसला 13 मंत्रिपदे मिळणार असल्याचे सांगण्यात येते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.