आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातोश्रीच्या मिठाला न जागणाऱ्याने 10 रुपयाच्या थाळीबद्दल शिकवू नये, कणकवलीत उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्लाबोल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंधुदुर्ग- शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंची आज कणकवली इथे जाहीर सभा पार पडली. नुकतंच स्वाभीमानी पक्ष भाजपात विलीन करून भाजपमयी होणारे खासदार नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सभेत सुरुवातीला शिवसेना नेते सुभाष देसाई, मग संजय राऊत आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राणेंवर जोरदार हल्ला चढवला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मातोश्रीच्या मिठाला न जागणाऱ्याने 10 रुपयाच्या थाळीबद्दल शिकवू नये. तू मातोश्रीच्या मिठाला जागला नाहीस. 10 रुपयात थाळी मातोश्रीवर बनवून देणार म्हणून तू काय सांगतोस?" असा टोलाही उद्धव ठाकरेंनी राणेंना लगावला. तसेच, रामायण काळाची साक्ष देत, "रामायणातले राक्षस मायावी रूप धारण करायचे. तसेच हे आहेत. आधी शिवसेना, त्यानंतर काँग्रेस, मग स्वत:चा पक्ष आणि आता भाजप." असेही उद्धव ठाकरे म्हणाले. "करून करून भागले आणि देव पूजेला लागले. देवपूजा करताना ज्यांनी चपला काढल्या नाहीत असे लोक देवपूजेला लागली कशी ?" अशी जहरी टीकाही त्यांनी राणेंवर केली.


"21 तारखेला संपूर्ण कोकण भगवा करणार अशा निश्चयाने तुम्ही आलात म्हणून तुम्हाला धन्यवाद. कणकवलीमध्ये मी आपल्या अधिकृत उमेदवाराला जिंकवण्यासाठी आलो आहे. संपूर्ण महाराष्ट्र भगवा होणार असे चित्र आपल्याला दिसत आहे. जर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षातला एखादा चांगला उमेदवार दिला असता, तर मी त्यांच्याही प्रचाराला आलो असतो. पण, यांना सत्तेचा माज आहे. आज स्वाभिमान हा शब्द खूप आनंदीत झाला असेल कारण, मला इतका दिवस काळिमा लागला होता. इकडे वाकवा मान तिकडे वाकवा आणि म्हणे स्वाभिमान." असा टोलाही उद्धव ठाकरेंनी राणेंना लगावला.
 

बातम्या आणखी आहेत...