आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिर ट्रस्टवर शिवसेनेचा एक सदस्य नेमा, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे पीएम मोदींना पत्र

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

मुंबई - राम मंदिर ट्रस्टमध्ये शिवसैनिकाला जागा देण्याची मागणी करणारे पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राम मंदिराच्या बांधकामाची देखरेख करण्यासाठी राम मंदिर ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. त्याच समितीवर शिवसैनिक नेमण्याची मागणी सरनाईक यांनी मोदींकडे केली. शिवसेना संस्थापक आणि प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राम मंदिर निर्मितीच्या मोहिमेत मोठे योगदान आहे असा उल्लेखही सरनाईक यांनी आपल्या पत्रामध्ये केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. त्या निमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब शनिवारी अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी आपण हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवल्याची माहिती ठाणे येथून आमदार असलेले सरनाईक यांनी दिली. दोन पानांच्या या पत्रामध्ये राम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांनीही केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख त्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 फेब्रुवारी रोजी लोकसभेत 15 सदस्यीय श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना केली. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, या ट्रस्टची स्थापना करण्यात आली. 

परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर ट्रस्टची स्थापना करताना मुद्देसूदपणे शिवसेनेला दुर्लक्षित केले. राम मंदिर बांधले जात असले तरीही त्यासाठी हजारो शिवसैनिकांनी आणि ठाकरे कुटुंबियांनी केलेले योगदान विसरता येणार नाही. त्यामुळे, मी पंतप्रधान मोदींना विनंती करतो की त्यांनी राम भक्त शिवसैनिकाला राम मंदिर ट्रस्टवर सदस्य म्हणून नेमावे. असेही सरनाईक यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...