आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोग्राफी स्वतःसाठी ऑक्सीजन असल्याचे मानतात उद्धव ठाकरे, पाहा त्यांच्या कॅमेऱ्यातून केली गेलेली काही छायाचित्रे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान उद्धव म्हणाले होते, 'फोटोग्राफी माझ्यासाठी ऑक्सीजन, मी ते सोडू शकत नाही'
  • उद्धव यांनी आपल्या फोटोंचे संकलन 'महाराष्ट्र देशा' नावाने प्रकाशित झालेल्या पुस्तकातून सादर केले

​​​​मुंबई : शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होणार आहेत. उद्धव यांना राजकीय वारसा पिता स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळाला. व्यंगचित्रकार असलेल्या वडिलांच्या मुलाला मात्र राजकारणापेक्षा जास्त फोटोग्राफीची आवड होती. सांगितले जाते की, फोटोग्राफीच्या आवडीमुळे ते 40 वर्षे राजकारणापासून दूर राहिले. 
उद्धव ठाकरे यांची फोटोग्राफीची आवड एका प्रसंगावरून प्रकर्षाने लक्षात येते. पुण्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले होते, फोटोग्राफी माझ्यासाठी ऑक्सीजन आहे. कुणी काहीही म्हणो, मी फोटोग्राफी सोडू शकत नाही. 

उद्धव यांना लहानपणापासून फोटोग्राफीची आवड आहे... 


उद्धव यांना बालपणापासूनच फोटोग्राफीची आवड राहिली आहे. वाइल्ड लाइफ आणि नेचर फोटोग्राफी त्यांचे आवडते विषय आहेत. ते फोटो प्रदर्शन आणि पर्यावरणा शी निगडित कार्यक्रमांचे नेहमी आयोजन करत असतात. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये अनेकदा उद्धव यांच्या फोटोंचे एग्जीबिशन होत असते. या प्रदर्शनांमधून होणारी कमाई ते शेतकरी आणि गरजवंतांसाठी मदत म्हणून डोनेट करतात. 

छायाचित्रांचे पुस्तक....  
 
उद्धव यांनी आपण चित्रित केलेली छयाचित्रे एकत्र करून 'महाराष्ट्र देशा' नावाच्या एका पुस्तकाच्या स्वरूपात सादर केले आहेत. या पुस्तकात महाराष्ट्रातील 27 मोठमोठ्या किल्यांचे एरियल व्ह्यू चे फोटो आहेत यामध्ये शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड, विशाल गड, पुरंदर आणि दौलताबाद हे किल्ले आहेत. सोबतच या पुस्तकात राज्याची प्रमुख मंदिरे आणि हाजी अली दर्ग्याच्या फोटोदेखील आहे. 

एरियल फोटोग्राफी आवडती.... 
 
आकाशातून किल्यांचे फोटो काढण्यासाठी उद्धव यांनी सुरक्षा मंत्रालयाकडून क्लीयरन्स घेतला होता. हे सर्व फोटो हेलिकॉप्टरमधून खूप उंचीवरून घेतले गेले आहेत. महाराष्ट्रातील किल्यांचे असे स्वरूप जगासमोर सादर करणाऱ्या उद्धव यांनी 'दुर्ग प्रेमी संघटना' देखील बनवली. याव्यतिरिक्त उद्धव यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारी यात्रेचादेखील एरियल फोटोग्राफ काढला. 

2008 मध्ये इंफ्रारेड फोटोग्राफी... 
 
2008 मध्ये उद्धव यांनी इंफ्रारेड टेक्निकचा वापर करून कॅनडाच्या 'हडसन बे' मध्ये सुमारे शून्य तापमानामध्ये पोलर बिअर आणि कम्बोडियाच्या मंदिराचे फोटो काढले. या फोटोंमुळे ते एक प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून समोर आले. 

इच्छा... 


काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत उद्धव यांनी सांगितले होते की, ते जगातील सक्रिय ज्वालामुखी, अंटार्कटिक प्रदेश आणि माउंट एव्हरेस्ट पर्वतांच्या श्रृंखलेचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद करू इच्छितात.