आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यवीर सावरकर देशाचे पहिले पंतप्रधान असते तर पाकिस्तान जन्मालाच आला नसता - उद्धव ठाकरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सावरकर देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तानची निर्मितीच झाली नसती. असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. लेखक विक्रम संपथ यांच्या 'सावरकर इकोज फ्रॉम अ फॉरगाटेन पास्ट' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, गांधी आणि नेहरूंच्या कामाला मी नाकारत नाही. महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी देशासाठी योगदान दिले आहे. मात्र इतर कोणीही राष्ट्राच्या विकासात योगदान दिले नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. 

त्यावेळी राहुल गांधीला बेकार म्हणणारा मी पहिला व्यक्ती - उद्धव ठाकरे 
या कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत राहुल गांधीने सावरकरांविरोधात विधान केले होते. त्यावेळी राहुल गांधी बेकार आहे असे म्हणणारा मी पहिला व्यक्ती होतो. या पुस्तकाची एक प्रत राहुल गांधीला वाचण्यासाठी पाठवावी. राहुल गांधींनी सांगितले की, नेहरू देशासाठी तुरुगांत गेले होते. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की सावरकरांनी 14 वर्ष तुरुंग यातना भोगल्या आहेत. नेहरूंनी जर 14 मिनिटांसाठी जरी हा त्रास सहन करावा लागला असता तर आज त्यांना वीर म्हटले गेले असते. 

सावरकरांच्या तुरुंगाला पिकनिक स्पॉटमध्ये रूपांतरित केल्याची खंत
सावकरांना ज्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्याला 'पिकनिक स्पॉट' मध्ये रुपांतरित करण्यात आले आहे. आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे. ते म्हणाले, 'जेल लोकांसाठी पिकनिक स्पॉट बनली आहे. परंतु, तुरूंगात असताना सावरकरांना काय वेदना भोगाव्या लागल्या हे लोकांना ठाऊक नाही.
 

बातम्या आणखी आहेत...