आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले आश्चर्य; काँग्रेसला अध्यक्षपद कसे काय, ठाकरेंनाही ठेवले अंधारात ?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसला सोडल्याची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काही कल्पना नव्हती. शिवसेनेचा बालेकिल्ला असतांना अध्यक्षपद काँग्रेसला सोडणे हे त्यांनाही अपेक्षित नव्हते, हे कळाल्यावर त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. त्यांना अंधारात ठेवण्यात आले, असा आरोप कृष्णा पाटील डोणगावकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
अध्यक्षपदासाठी ३ जानेवारी रोजी निवडणूक होती. आम्हांला २ जानेवारी रोजी रात्री वीट्स हॉटेलवर कळाले की, अध्यक्षपद काँग्रेसला सोडण्यात आले आहे. वास्तविक पाहता, हे पद काँग्रेसला सोडण्याचे काहीच कारण नव्हते. शिवसेनेचे १८ आणि काँग्रेसचे सत्तार यांचे ६ असे २४ सदस्य हे शिवसेनेचेच होते. जिल्हा परिषदेत शिवसेनेचाच व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न केले. आपल्या राज्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून पक्षहितासाठी हे केले. माझ्यावर झालेली कारवाई अन्यायकारक आहे. माझी भूमिका मी पक्षप्रमुखांसमोर मांडली असून, माझ्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल, असा विश्वास असल्याचे डोणगावकर म्हणाले. निवडणुक प्रक्रियेविरुद्ध मी न्यायालयात याचिका दाखल केली असून, २१ जानेवारी रोजी सर्व काही स्पष्ट होईल, न्यायालयात आम्हांला दाद मिळेल. जि.प.त शिवसेनेचा अध्यक्ष व्हावा, याच भूमिकेत पक्षही येईल.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी आम्हांला अर्ज भरू नका, आपण हे पद त्यांना सोडले आहे, म्हणून सांगितले.परंतू आम्हांला फॉर्म भरू द्या, वाटलं तर मागे घेवू, असे त्यांना आम्ही सांगितले होते. पण त्यानंतर कुणीही संपर्क केला नाही. नंतर सत्तारांशी बोलणे झाले, अध्यक्षपदाचा फॉर्म मागे घ्यायचा, अन् उपाध्यक्षपदासाठी किशोर बलांडेंना पाठिंबा द्यायचा, पण त्याचीही अंमलबजावणी झाली नाही, असे डोणगावकर म्हणाले. यावेळी अॅड. देवयानी  डोणगावकर, राजेंद्र राठोड, किशोर पवार यांची उपस्थिती होती.

माजी अध्यक्षांना प्रशासन जुमानेना...


निवडणुक प्रक्रिया पार पडलेल्या सभागृहातील सीसीटिव्ही फुटेज देण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. प्रशासनाने त्यांना सीडीज् दिल्या, पण फुटेजमध्ये काटछाट केलेली आहे, संपूर्ण फुटेज द्यावे, अशी मागणी वारंवार प्रशासनाकडे केली आहे. परंतू अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे, असा आरोपही डोणगावकर यांनी केला आहे. निवडणुक प्रक्रिया राबवणारी यंत्रणा महसूलची असून, अध्यक्ष काँग्रेसचा होणार होता, त्यामुळे अधिकाऱ्यांवर दुसरा कोण दबाव टाकणार, असा प्रश्न डोणगावकर यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता उपस्थित केला.
जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीसाठी असलेल्या पीठासीन अधिकाऱ्यांना सभागृह कामकाजात व्यवस्था करण्याविषयी आलेल्या आदेशान्वये आम्ही व्यवस्था केली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेवरुन मी मदतीसाठी उपस्थित होतो. पीठासीन अधिकाऱ्यांमार्फत याची शहानिशा करावी. ”-शिरीष बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन, जिल्हा परिषद

बातम्या आणखी आहेत...