आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uddhav Thackeray Gives Candidate AB Formeven Before The Alliance Is Officially Announced, Sanjay Shirsat From Aurangabad West

जागावाटपाची घोषणा हाेण्यापूर्वीच शिवसेनेने वाटून टाकले एबी फाॅर्म, आदित्य ठाकरेंना वरळीतून उमेदवारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पितृपक्ष संपताच विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप-शिवसेना युतीमधील जागावाटपाच्या अधिकृत घाेषणेची वाट न पाहता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी आपल्या सुमारे १५ उमेदवारांना थेट मुंबईत बाेलावून एबी फाॅर्मचे वाटप केले. यात बहुतांश विद्यमान आमदारांचा समावेश आहे.  तसेच युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचीही वरळीतून उमेदवारी निश्चित झाली असून ते २ किंवा ३ ऑक्टाेबरला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे, काँग्रेसनेही ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. 
 

नारायण राणे गांधी जयंतीला भाजपमध्ये
भाजप प्रवेशाकडे डोळे लावून बसलेल्या नारायण राणे यांचा आता २ आॅक्टाेबर राेजी नितेश आणि नीलेश या दोन पुत्रांसह भाजपत प्रवेश हाेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईत गरवारे क्लबमध्ये हाेणाऱ्या कार्यक्रमात ते भव्य शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपत विलीन हाेईल. तत्पूर्वी आमदार नितेश हे काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देतील.
 

भाजपची दिल्लीत खलबते :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेते रविवारी दिल्लीत हाेते. पंतप्रधान नरेंद्र माेदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या  नावांवर अंतिम चर्चा झाली. इतर पक्षांतून भाजपत आलेल्या किती जणांना उमेदवारी द्यायची याबाबतही मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन घेतल्याची माहिती आहे. शिवसेनेपाठाेपाठ आता भाजपही लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करेल, अशी माहिती पक्षातून देण्यात आली.
 

मराठवाड्यातील शिवसेना ‌उमेदवार
संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम), संदीपान भुमरे (पैठण), अर्जुन खाेतकर (जालना), संताेष बांगर (हिंगाेली).

काँग्रेस : भोकरमधून अशोक चव्हाण
डॉ. कल्याण काळे (फुलंब्री), डी. पी. सावंत (नांदेड उत्तर), वसंतराव चव्हाण (नायगाव), संतोष टारफे (कळमनुरी), अमित देशमुख (लातूर शहर), बसवराज पाटील (औसा), मधुकरराव चव्हाण (तुळजापूर).
 

काँग्रेसने उमेदवारी कापलेले सहा आमदार भाजपमध्ये
भाजपशी जवळिकीमुळे काँग्रेसने अस्लम शेख, राहुल बोंद्रे, काशीराम पावरा, डी. एस. अहिरे, सिद्धराम मेहेत्रे, भारत भालके यांना तिकीट नाकारले. हे आमदार सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शेख हे शिवसेनेच्याही संपर्कात होते. मात्र एेनवेळी त्यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला. 
 

तुरुंगातील शिवसेना आमदार साेनवणेंच्या पत्नीला तिकीट
जळगाव - घरकुल घाेटाळ्याप्रकरणी नाशिक तुरुंगात असलेले सेना आमदार प्रा.चंद्रकांत साेनवणे यांच्या पत्नी लताबाई यांना चाेपडातून पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.लताबाई यांच्या वतीने त्यांचे दीर श्यामकांत साेनवणे यांनी रविवारी मुंबईत ‘माताेश्री’वर जाऊन लताबाई यांचा एबी फाॅर्म स्वीकारला.