आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छत्रपती शिवाजी महाराज आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इतिहास घडवला: उद्धव बाळासाहेब ठाकरे ठरले ठाकरे घराण्यातील पहिले मुख्यमंत्री

मुंबई- महाराष्ट्राच्या महानाट्यानंतर अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील शिवाजी पार्कवर भव्य-दिव्य सोहळ्यात ठाकरे घराण्यातील पहिल्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्या या ऐतिहासिक शपथविधीचे साक्षीदार होण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवतीर्थावर एकवटले. यावेळी राज्य आणि देशातील अनेक नेतेमंडळींसह उद्धव ठाकरेंचे बंधू राज ठाकरेंची उपस्थिती लक्षणीय होती.

तिन्ही पक्षातील दोन-दोन मंत्र्यांनी शपथ घेतली


उद्धव ठाकरेंसोबत महाराष्ट्र विकास अघाडी म्हणजेच, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील दोन-दोन आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी शिवसेनेचे नेते एकनाथ संभाजी शिंदे आणि सुभाष राजाराम देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच, राष्ट्रवादीचे नेते जयंत राजाराम पाटील आणि छगन चंद्रकात भूजबळ यांनी शपथ घेतली. शेवटी कांग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन काशीनाथ राऊत यांनी मंत्रिपदाची शपध घेतली.
बुधवारी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळातील खातेवाटपबाबत अंतिम चर्चा झाली. होती बुधवारी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, येत्या 3 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल.
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय सर्वात आधी घेणार असल्याचे बोलले जात आहे. यासोबतच पीकविम्यावरही ठोस निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले की, नाणार रिफायनरी आणि बुलेट ट्रेन प्रोजेक्टवर कॅबिनेट मीटिंगमध्ये चर्चा होईल. आम्ही असा कायदा काढू, जेणेकरुन भविष्यात येणाऱ्या कंपन्यामध्ये 80% रोजगाराची संधी महाराष्ट्रातील तरुणांना मिळेल.

सोनिया गांधींची अनुपस्थिती
 
शिवाजी पार्क मैदानावर पार पडलेल्या ऐतिहासिक सोहळ्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांतील अनेक नेते आले होते. पण, या सोहळ्याला सोनिया गांधींची अनुपस्थिती होती. शिवसेनेकडून स्वतः अदित्य ठाकरेंनी दिल्लीला जाऊन त्यांना निमंत्रण दिले होते. मात्र त्या या सोहळ्याला हजर राहू शकल्या नाही. त्यांनी पत्र पाठवून या संदर्भातली माहिती दिली आहे. 

70 हजार खुर्च्यांची सुविधा
 
उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला भव्य-दिव्य करण्यासाठी मोठी तयारी करण्यात आली. बीएमसी, पीडब्लूडी आणि पोलिसांचा मोठा फौज फाटा शिवतीर्थावर तैनात करण्यात आला आहे. शिवाजी पार्कच्या मैदानात 70 हजार खुर्च्या लावण्यात आल्या, तसेच एका मोठ्या मंचावर मान्यवरांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.यामुळे शिवाजी पार्कवर शपथविधी
 
ठाकरे कुटुंबासाठी मुंबईतील शिवाजी पार्क खूप महत्वाचा आहे. याच मैदानात दसरा मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊतांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, अशी घोषणा केली होती. याच मैदानात पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अंत्यविधी झाला होता. ज्या स्टेजवर शपथविधी घेतला गेला, त्या स्टेजमागे मोठी शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि बाळासाहेबांचे स्मारकदेखील आहे.