आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअयोध्या - अयाेध्या दाैऱ्यावर असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सकाळी साडेआठ वाजता राम जन्मस्थळाचे दर्शन घेतले, तेव्हा ते भावुक झाले होते. नंतर पत्रकारांशी बाेलताना ते म्हणाले, 'हे राम जन्मस्थळ अाहे की तुरुंग असा प्रश्न मला पडला. अजूनही राम तुरुंगातच दिसतात. हा तुरुंगवास संपला पाहिजे. अख्ख्या जगाला हेवा वाटेल असे मंदिर येथे झाले पाहिजे. यापुढे भाजपचे सरकार येईल की नाही माहिती नाही; पण कोणत्याही परिस्थितीत मंदिर तर होणारच,' असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले, निवडणूक आली की सर्वांना मंदिराचा मुद्दा आठवतो. निवडणुकीत सर्वजण 'रामराम' करतात, नंतर मात्र आराम करतात.गेल्या निवडणुकीत भाजपच्या जाहीरनाम्यात राममंदिर उभारणीबाबत 'सभी संभावनों की तलाश की जायेगी' असा उल्लेख आहे. गेल्या चार वर्षांत एकही संभावना त्यांना सापडली नाही का? संभावना शोधण्याऐवजी जर हे प्रकरण कोर्टापुढेच ढकलायचे असेल तर मग मंदिराचे अाश्वासनही चुनावी जुमला असण्याचे जाहीर तरी करा,' असा टाेला त्यांनी लगावला.
'हिंदू अब मार नहीं खायेगा' असे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते. ते आजही खरे आहे. पण आता हिंदू गप्पही राहणार नाही. लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यात मंदिरासाठी कायदा करा, अध्यादेश काढा पण निर्णय घेतलाच पाहिजे. हिंदूंच्या भावनांशी आता खेळू नका, अवघड जाईल,' असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.
मुंबईत उत्तर भारतीय सुरक्षितच
'गेल्या ८ दिवसांपासून अयाेध्येत शिवसेनेचे अनेक पोस्टर्स, बॅनर्स आहेत आणि त्यातील एकही फाटले नाही. अयोध्यावासी हे सर्वांचा सन्मान करतात, परंतु मुंबईत उत्तर भारतीयांच्या बाबतीत तसे होत नाही,' याकडे स्थानिक पत्रकारांनी उद्धव ठाकरेंचे लक्ष वेधले असता 'मुंबईत उत्तर भारतीयांच्या सुरक्षेसाठी आम्ही सक्षम आहोत,' असे ठाकरे म्हणाले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.