आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेत आल्यानंतर सर्वात आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंनी दिला शब्द

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं दिवाळं काढलं आहे. या पावसात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण, पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, शिवसेना त्यांच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ते सध्या औरंगावाद दौऱ्यावर आहेत आणि येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.




पुढे ते म्हणाले की, "आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्वात आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार. पावसाचे दुष्टचक्र आपल्या मागे लागलं आहे. शेतकऱ्यांने खचून जाण्याचे काही कारण नाहीये, मी प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळून देणार. शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचारही मनात आणू नये. माझा शेतकरी मर्द आहे. तो संकटावर मात करेल. राज्याचा अन्नदाता संकटात आहे. 10 हजार कोटी पुनर्वसनासाठी पुरेसे नाहीत, आम्ही ते वाढवून देऊत." असे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले. तसेच, शेतकऱ्यांना मदत करताना कागदपत्रांचा घोळ घालू नका, असा सज्जड दमही उद्धव ठाकरेंनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिला.




"माझे वचन आहे, आपले सरकार आल्यास सातबारा कोरा करेन. दहा हजार कोटी कमी आहेत, ते वाढवले जातील. मत देताना तुम्ही आधार कार्ड किंवा कागदपत्रे विचारली नाहीत, मग आम्ही पण तुम्हाला कागदपत्रे विचारणार नाही. सर्व अडथळे बाजूला सारुन शेतकऱ्यांना मदत देऊ. मी नेता म्हणून नाही, तर कुटुंब म्हणून आलो आहे. कारण भलेभले नेते मोठे झाल्यावर विसरुन जातात. पण मी तुम्हाला धीर द्यायला आलो आहे." असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, "अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना जर नोटिसा बजावत असाल तर त्या जाळूच पण तुम्हालासुद्धा वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही." कर्जवसूलीसाठी नोटीसा बजावणाऱ्या बँकाना उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला.

 

बातम्या आणखी आहेत...