आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिल्लोड - शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारसभेसाठी सिल्लोडमध्ये सभा घेत आहेत. आज आपल्यासोबत सत्तार आहे उद्या आपल्या हातात सत्ता येईल असे ते यावेळी म्हणाले. शेवटी वाघ हा एकटा लढून जिंकत असतो म्हणत शहरातील बंडखोरांना लगावला टोला.
शिवसेना पहिल्यांदाच सिल्लोड मतदारसंघ लढवत आहे
अब्दुल सत्तार यांच्यामार्फत शिवसेना पहिल्यांदाच सिल्लोड मतदारसंघ लढवत आहे. अब्दुल सत्तार हे सिल्लोडचे काँग्रेसच्या तिकीटावर झालेले विद्यमान आमदार आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या वेळी अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर विधानसभेसाठी ते भाजप पक्षात येऊ इच्छित होते. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवेळी सत्तार यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. मात्र भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे अब्दुल सत्तारांनी अखेर शिवबंधन बांधले. 2014 पर्यंत सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघ भाजपकडे होता. मात्र यावेळी तो शिवसेनेला सोडण्यात आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.