आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शपथविधीनंतर उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंच्या आईंचा आशीर्वाद, कुंदाताई ठाकरेंना अश्रु अनावर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्धव ठाकरे राज्याचे 29 वे मुख्यमंत्री झाले

मुंबई- आज ऐतिहासिक क्षण महाराष्ट्रातील जनतेला अनुभवायला मिळाला. नेहमी पडद्यामागून राज्य चालवणाऱ्या ठाकरे घराण्यातील पहिला व्यक्ती एकही निवडणूक न लढवता थेट मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाला. शिवसेना पक्षप्रमुखे उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी हजारो शिवसैनिक मुंबईतील शिवतीर्थावर उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याला ठाकरे कुटुंबाचा भावनिक क्षणही लोकांना पाहण्यास मिळाला. उद्धव ठाकरेंचे बंधू राज ठाकरे यांच्या आई कुंदाताई शपथविधीला उपस्थित होत्या. उद्धव ठाकरेंनी त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यावेळी कुंदाताईंना अश्रु अनावर झाले. 



शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला संपूर्ण ठाकरे कुटुंब हजर होते. ठाकरे घराण्यासाठी आजचा दिवस हा अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा असाच होता. उद्धव यांनी शपथ घेतल्यानंतर सर्व दिग्गज मान्यवरांनी त्यांचं व्यासपीठावर अभिनंदन केलं. यावेळी राज यांनी हस्तांदोलन करून उद्धव यांचे अभिनंदन केले. त्यानंतर राज यांच्या आई कुंदाताई ठाकरे जेव्हा उद्धव यांना भेटल्या तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. उद्धव ठाकरेही यावेळी भावूक झाले होते.  अत्यंत भावनिक असा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.



तिन्ही पक्षातील दोन-दोन मंत्र्यांनी शपथ घेतली


उद्धव ठाकरेंसोबत महाराष्ट्र विकास अघाडी म्हणजेच, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील दोन-दोन आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी शिवसेनेचे नेते एकनाथ संभाजी शिंदे आणि सुभाष राजाराम देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच, राष्ट्रवादीचे नेते जयंत राजाराम पाटील आणि छगन चंद्रकात भूजबळ यांनी शपथ घेतली. शेवटी कांग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन काशीनाथ राऊत यांनी मंत्रिपदाची शपध घेतली.

बातम्या आणखी आहेत...