आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार नसताना मुख्यमंत्रिपदी विराजमाना होणारे उद्धव ठाकरे राज्यातील 8 वे मुख्यमंत्री   

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्धव ठाकरे - Divya Marathi
उद्धव ठाकरे
  • माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही आमदार नसताना मुख्यमंत्री झाले होते

मुंबई- आज शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा शपथविधी सोहळा संध्याकाळी मुंबईतील शिवतीर्थावर पार पडत आहे. उद्धव ठाकरे हे आमदार नसताना मुख्यमंत्रिपदी विराजमान होणारे राज्याचे 8 वे मुख्यमंत्री असतील. यापूर्वी काँग्रेस नेते ए. आर. अंतुले, वसंतदादा पाटील,
शिवाजीराव निलंगेकर-पाटील, शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमदार नसताना मुख्यमंत्रिपदी विराजमाना झाले आहेत.उद्धव ठाकरेंच्या रुपाने ठाकरे घराण्यातील पहिला व्यक्ती मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहे. संविधानातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्ती विधानसभा किंवा परिषदेचा सदस्य नसेल, तर त्याला शपथविधी पार झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांच्या आत विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे सदस्य व्हावे लागते.  काँग्रेस नेते ए. आर. अंतुले यांनी 1980 मध्ये राज्यातील पहिले मुख्यमंत्री होते, जे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. त्यानंतर 1983 मध्ये लोकसभेचा राजीनामा देऊन वंसतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर 1985 मध्ये शिवाजीराव निलंगेगर-पाटील राज्याचे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. पण परत 1986 मध्ये केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले.नरसिम्हा राव सरकारमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देशाचे संरक्षणमंत्री होते. पण, 1993 मध्ये झालेल्या दंगलीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकररावर नाईक यांना मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले होते आणि त्यांच्या जागी शरद पवारांची वर्णी लागली होती. तसेच, 2010 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे आदर्श घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी मनमोहन सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाणांची वर्णी लागली. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यावर ए. आर. अंतुले आणि शिवाजीराव निलंगेकर-पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवून विक्रमी विजय मिळवला होता, तर इतर चार नेते विधान परिषदेवर गेले होते.

बातम्या आणखी आहेत...