आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लाव रे तो व्हिडिओ'ला 'लाव रे ते फटाके...' म्हणत उद्धवांचा राज ठाकरेंना टोला तर देशात मोदींचीच  सुप्त लाट : मुख्यमंत्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मुंबई - लाव रे तो व्हिडिओ आणि मोदी-शहा या जोडगोळीला भारताच्या राजकीय क्षितिजावरून हद्दपार करा, असे आवाहन करणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख न करता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “लाव रे ते फटाके’ म्हणत त्यांना टोला लगावला. तसेच अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा करून अभिनंदन केले असून आता नरेंद्र मोदी यांच्याशीही संपर्क साधणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोणाच्याही पराभवाचा विचार न करता विजयाचा आनंद साजरा करूया, असे म्हणत त्यांनी पार्थ पवार आणि शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.


राज्यात युतीला ४१ जागा मिळत असल्याने आणि केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे सरकार येत असल्याने उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत संध्याकाळी मातोश्रीवर गेले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्या काही उमेदवारांचा पराभव झाला, तर काहींचा विजय आणि यालाच लोकशाही म्हणतात. आम्ही पराभवाने खचत नाही आणि यशाने हुरळूनही जात नाही. आमची युती कायम असून ती विधानसभा निवडणुकीनंतरही कायम राहील, असे स्पष्ट करतानाच काम करताना आमच्या काही चुका होऊ शकतात. तेव्हा आमचा कान धरण्याचा अधिकार तुम्हाला आहे, असेही त्यांनी पत्रकारांना म्हटले.

 

देशात मोदींचीच  सुप्त लाट : मुख्यमंत्री
भाजपच्या या विजयामुळे देशात मोदींची लाटच नव्हे, तर सुनामी असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशात मोदींची सुप्त लाट आहे. तिचे सुनामीत रूपांतर होईल, असे मी निवडणुकीआधी म्हटले होते. आजच्या निकालातून हेच स्पष्ट झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...