आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला, तर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बजावले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औैरंगाबाद : शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे कुठलेही निकष न लावता, कुठलीही मोजपट्टी-फुटपट्टी न लावता हेक्टरी २५ हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. सध्याची स्थिती पाहता शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ५० हजार रुपयांच्या मदतीची गरज आहे. यासाठी कुठलेही कागदी घोडे न नाचवता मदत करावी, असे सांगत आता मोदी सरकारनेही मदत करण्याची गरज असल्याची मागणी ठाकरे यांनी केली.

अधिकाऱ्यांनो, निवडणूक संपली, आता दुष्काळ निवारणाच्या कामाला लागा
उद्धव म्हणाले..
.
- सरकार म्हणून जी १० हजार कोटींची मदत जाहीर केलेली आहे ती अत्यंत त्रोटक आहे.
- विमा कंपन्या मधल्यामध्ये मलिदा खातात. विमा कंपन्यांचे हेच भांडे मी फोडले होते. कागदी घोडे नाचवू नका. शेतकऱ्यांना पुढच्या मोसमाची तयारी करायची आहे. तातडीने मदत द्या.
- मी पुन्हा येईन, या मुख्यमंत्र्यांच्या गाजलेल्या वक्तव्यावर कोटी करत पावसाच्या संदर्भाने उद्धव ठाकरे म्हणाले, लोकांना त्याची चांगलीच भीती बसलीय...
- राजकीय निर्णयाबाबत विचारल्यावर यावर थेट भाष्य टाळत उद्धव म्हणाले, मी मदतीच्या निर्णयापर्यंत आलो आहे.

बँकांनी जखमेवर मिठामध्ये मसाला, तिखट लावून चोळू नये
मला शेतकऱ्यांनी बँकांची नोटीस दाखवली. बँकांचे हे काम जखमेवर मिठामध्ये मसाला टाकून चोळण्यासारखे आहे. बँकांनो, माणुसकीने वागा, शेतकऱ्यांना संकटात घालू नका, असा इशारा उद्धव यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांना टोला : परतीचा पाऊस म्हणतो 'मी पुन्हा येईन'... लोकांना भीती बसलीय!

अकोला : गेल्या ३०-४० वर्षांत पाहिली नाही अशी भयंकर दुष्काळी स्थिती आहे. ऑक्टोबरमध्ये यापूर्वी कधीही १४ दिवस पाऊस पडला नाही. शेतकरी उद्ध्वस्त व्हावा, एवढी गंभीर स्थिती आहे. त्यामुळे त्याला मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करा. त्यासाठीचे सर्व 'जीआर' लवकरच काढले जातील. आता निवडणूक संपली आहे. दुष्काळ निवारणार्थ मिशन मोडमध्ये कामाला लागा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले.

निकष, मोजपट्टी न लावता शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत करा
मुख्यमंत्री म्हणाले..
.
- अनेक शेतकऱ्यांना विम्याचे कवच आहे. परंतु त्यासाठी संबंधित कंपनीला वेळेत 'इंटिमेशन' द्यावी लागते. त्यासाठी शेतकऱ्यांना मदत करा.
- योग्य प्रमाणात रक्कम देण्यासाठी वेळेत पंचनामे पूर्ण करावेत. प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामा करता आला नाही, तर सरकारी मदतीसाठी केवळ फोटो हे प्रमाण मानले जावे.
- एखाद्या अधिकाऱ्याने नियमाच्या पलीकडे जाऊन काम केले तरी चालेल. फक्त ते काम शेतकरी हिताचे असावे, सरकार त्यांना सांभाळून घेईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांनाही या कामासाठी दिलासा दिला.

बँकांनी सद्य:स्थितीत सर्व प्रकारची वसुली तातडीने थांबवावी
एखाद्या बँकेने कर्जवसुली सुरू केली, कोणत्या तरी बँकेने लिलाव जाहीर केला, बिल भरले नाही म्हणून वीज कापली, असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी वसुली थांबवा, असे निर्देशही दिले.
मदत देण्यासाठी मिशन मोडमध्ये या : अकोला दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचे आदेश
 

बातम्या आणखी आहेत...