आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंडखाेरांनाे, आमच्या सुखात मांजरासारखे आडवे येऊ नका; उद्धव ठाकरेंची करमाळ्यात सभा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाळा - निवडणूक लढतानाही हिंमत लागते. ती विरोधकांत राहिली नाही. ते चोरून-चोरून अपक्षांना पाठिंबा देत आहेत. देशात एवढ्या मोठ्या पक्षाला ही वेळ का आली? पण अपक्ष निवडून करणार काय? त्यामुळे अपक्ष व बंडखोरांना सांगा की शिवसेनेने तुम्हाला खूप दिले आहे. आता आमच्या सुखात मांजरासारखे आडवे येऊ नका, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना इशारा दिला. ते करमाळा येथे सभेत बोलत होते. ठाकरे म्हणाले, धनगर समाजाचे प्रश्न आम्ही सोडवत आहोत. त्यामुळे जिथे जाईल तिथे धनगर समाज घोंगडे आणि काठी देऊन माझा सन्मान करत आहे. या काठीला तलवारीची धार कशी लावता येईल, याकडे लक्ष आहे. 
सरकारी पीक विमा कंपनी : कर्जमाफीपेक्षा कर्जमुक्तीची गरज आहे. तर सत्तेत असतानाही हातावर हात धरून बसलो नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत राहिलो. जिथे बरोबर आहे तिथे बरोबर येथे चूक आहे तिथे जागा दाखवण्याची ताकद दाखवली आहे. यामुळेच शेतकऱ्यांचे प्रश्नही सुटले, असे ठाकरे म्हणाले.
 

जनतेसाठी स्वयंपाकही करू, मात्र तुमच्या धरणातील पाणी नको
बार्शी | आम्ही जनतेसाठी स्वयंपाकही करू, मात्र तुमच्या धरणातील पाणी नको. ज्यांनी वसंतदादांच्या पाठीत वार केला, असा मित्रही नको, असा टोला उद्धव ठाकरे यांनी बार्शीत शरद पवार यांना लगावला. १० रुपयांत थाळीच्या योजनेवर पवार यांनी स्वयंपाक करणार का, असा सवाल केला होता.
 

‘बंडखोरांना ईव्हीएमच्या टकमक टोकावरून ढकला’
दिग्रस | येथे महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्र्यांनीही बंडखोरांवर सडकून टीका केली. येथे भाजपचे बंडखोर संजय देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. मुख्यमंत्री  म्हणाले, शिवरायांच्या स्वराज्याच्या विरोधात जाणाऱ्यांना ते टकमक टोकावरून ढकलून द्यायचे, पण आता लोकशाही असल्यामुळे असे करणे शक्य नाही. तरी ईव्हीएमच्या टकमक टोकावरून ढकलून देऊन त्यांना धडा शिकवावा.