आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राकडे 'जीएसटी'चे थकलेले 15 हजार काेटी राज्याला द्यावेत, विकासाला गती मिळण्यासाठी उद्धव ठाकरेंचे अर्थमंत्र्यांना पत्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'जीएसटी संकलनातून केंद्र प्रत्येक राज्याला कर परतावा देते, मात्र महाराष्ट्राला माेजकीच रक्कम मिळाली अाहे. केंद्र सरकारकडून राज्याला १५ हजार ५८८ कोटी पाच लाख रुपये येणे बाकी असून ते त्वरित देण्यात यावेत,' अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे केली अाहे. करपरतावा कमी झाल्याने राज्यातील विकास कामांवर परिणाम होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रात गेल्या दोन वर्षांचे कर संकलन आणि कर परताव्याचे आकडे दिले अाहेत. २०१९-२० च्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मिळणारा कर परतावा ४६ हजार ६३० कोटी ६६ लाख एवढा होता. तो २०१८-१९ च्या तुलनेत ११.१५ टक्के जास्त आहे. २०१८-१९ मध्ये राज्याला ४१ हजार ९५२ कोटी ६५ लाख परतावा मिळणार होता. परंतु ऑक्टोबर २०१९ पर्यंत राज्याला फक्त २० हजार २५४ कोटी ९२ लाख इतकाच परतावा मिळाला आहे. एकंदर ६ हजार ९४६ कोटी २९ लाख म्हणजेच २५.३३ टक्के रक्कम कमी मिळाली, असेही पत्रात म्हटले आहे.

मंदीमुळे परतावा घटण्याची भीती

अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे यापुढेही परतावा कमी मिळण्याची शक्यता अाहे. अातापर्यंत अपेक्षेपेक्षा केवळ १४ टक्के कमी जीएसटी संकलन झाले अाहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या चार महिन्यांत राज्याला पाच हजार ६३५ कोटी रुपये जीएसटी परतावा मिळाला. मात्र नोव्हेंबर २०१९ मध्ये ८ हजार ६११ कोटी ७६ लाख इतकी रक्कम जीएसटी परताव्यापोटी मिळणे बाकी आहे. मार्च २०१८ या वर्षअअखेर २०१९ च्या कॅग अहवाल ११ नुसार एकात्मिक वस्तू व सेवा कराची रक्कम समायोजित झालेली नाही. यामुळे या कराची मोठी रक्कम केंद्राकडून येणे बाकी आहे. ही रक्कम लवकरात लवकर मिळावी तर राज्यातील विकास कामांना वेग देता येईल, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...