आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई एकवीरा युतीला भरघोस यश मिळू दे.. उद्धव ठाकरे यांनी कार्लाच्या एकवीरा देवीला घातलं साकडं

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला भरघोस यश मिळू दे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्ला येथील एकवीरा देवीला साकडं घातलं आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सहकुटुंब त्यांनी कार्ला येथील एकवीरा देवीचे दर्शन घेतले. 

 

उद्धव ठाकरे हे सकाळी 10 वाजून 30 मिनिटांला कार्ला गडावर हेलिकॉप्टरने पोहोचले. पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत होते. यांच्यासह शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार आदी नेतेही यावेळी उपस्थित होते. तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी मोठी गर्दी केली होती.

 

चांगल्या कामासाठी एकवीरादेवीचा आशीर्वाद घेण्याची आमची परंपरा आहे. आईचे आशीर्वाद घेतल्यावर यश मिळते, हा अनुभव आहे. येत्या निवडणुकीत एकवीरा आईच्या आशीर्वादाने महायुतीच्या उमेदवारांना यश मिळेल, असा विश्वास उद्धव यांनी यावेळी व्यक्त केला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...उद्धव ठाकरे यांचे सहकुटुंब फोटो..

बातम्या आणखी आहेत...