आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - कोहिनूर स्क्वेअरमध्ये गैरव्यवहार प्रकरणी ईडीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावल्यानंतर राज यांना काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य पक्षांनी पाठिंबा दिला असतानाच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरेंची पाठराखण केली आहे. ईडीकडून राज ठाकरे यांची चौकशी होणार, याविषयी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले की ‘मला वाटत नाही, त्या चौकशीतून काही निघेल, त्यामुळे आपण एक-दोन दिवस थांबायला हवे. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला मी काही तज्ज्ञ नाही’
ठाणे बंद मागे घेण्यापाठोपाठ मनसेचे शक्तिप्रदर्शनही रद्द
राज ठाकरे यांच्या मनसेने अंमलबजावणी संचालनालयाने पाठवलेल्या (ईडी) नोटीसविरोधात प्रथम ठाणे बंदचे आवाहन केले परंतु काही तासांतच ते मागे घेतले. त्यानंतर मंगळवारी सकाळी राज ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते ईडी कार्यालयाजवळ जमणार असल्याचे मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी सांगितले. परंतु काही तासांतच स्वतः राज यांनीच ईडी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन करू नये असे ट्विट केले आणि मनसेचे हे शक्तिप्रदर्शनही आता रद्द झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.