आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयाेध्या दाैऱ्यातील भाषणाच्या तयारीसाठी उद्धव ठाकरेंना हिंदी भाषेची शिकवणी!:राज्याबाहेर पहिलीच सभा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अयाेध्येत श्रीराम मंदिर उभारण्याचा नारा देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २५ नाेव्हेंबर राेजी अयाेध्येच्या दाैऱ्यावर जात अाहेत. त्यांच्या दाैऱ्याची जय्यत तयारीही शिवसेनेकडून केली जात अाहे. या ठिकाणी जाहीर सभेत ठाकरे यांचे सुमारे एक ते सव्वा तासाचे भाषणही हाेणार अाहे. अाजवर केवळ महाराष्ट्रातील जाहीर सभांमधून तेही मातृभाषा मराठीत भाषण देणारे उद्धव अाता उत्तर प्रदेशातील या सभेत हिंदीतून संवाद साधणार अाहेत. या पार्श्वभूमीवर हिंदी भाषेतील शब्दांच्या उच्चाराची तज्ज्ञांकडून ते विशेष शिकवणीही घेत असल्याची खात्रीलायक माहिती अाहे.    


शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले, उद्धव ठाकरे अयोध्येत राम मंदिराबाबत बोलणार असल्याने त्यांना हिंदीतच भाषण करावे लागेल. उद्धव ठाकरे यांना हिंदी भाषा चांगल्या प्रकारे अवगत असून ते या भाषेत चांगले बाेलतातही. परंतु अाजवर हिंदीतून भाषण करण्याची वेळ त्यांच्यावर कधी अालेली नाही. तो योग अयाेध्येतील सभेच्या निमित्ताने अाला अाहे. अापल्या भाषणात उद्धव केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील हिंदूंना राम मंदिर उभारणीबाबत आवाहन करणार आहेत. यासाठी त्यांनी अयोध्येतील मंदिर उभारणीच्या पहिल्या आंदोलनापासूनची माहिती संकलित केली अाहे. त्यांच्या भाषणात हे मुद्दे ठळकपणे जाणवतील, त्यांची तयारीही अंतिम टप्प्यात अाली अाहे.    


खासदार संजय राऊत  यांनी सांगितले, उद्धव ठाकरे यांची रॅली ही भव्य असेल. अयोध्येतील श्रीरामांचे दर्शन घेण्याची त्यांची खूप वर्षांपासून इच्छा होती, ती २५ नोव्हेंबर रोजी पूर्ण होईल. त्यानंतर अयोध्येतील काही स्थानिक कार्यक्रमांनाही ते हजेरी लावणार असून संत-महंतांच्या भेटीही घेणार अाहेत.  

 

उद्धव यांची राज्याबाहेर पहिलीच सभा  
शिवसेनेने इतर राज्यांत निवडणुका लढवल्या, मात्र त्यासाठी उद्धव ठाकरेंनी कधीही प्रचारसभा घेतली नाही. त्यामुळे त्यांची राज्याबाहेरील व हिंदी भाषण करणारी ही पहिलीच जाहीर सभा असेल. यापूर्वी  एनडीएचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर दिल्लीत लोकसभेच्या आवारात खासदारांना संबोधित करताना त्यांनी हिंदीत छाेटेखानी भाषण दिले होते. तसेच दिल्लीतच व्यापाऱ्यांच्या एका परिषदेतही त्यांनी हिंदीतून मार्गदर्शन केले हाेते. 

 

बातम्या आणखी आहेत...