आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकासआघाडीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नावाची एकमताने घोषणा करण्यात आली. या बैठकीत आघाडीतल्या मित्रपक्षांसह 3 पक्षांची महाविकासआघाडीत एकमताने सत्ता स्थापनेसंदर्भात महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान या बैठकीत महाविकासआघाडीचे 'महाराष्ट्र विकास आघाडी' असे नामकरण करण्यात आले. तत्पूर्वी बैठकीच्या सुरुवातीला 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच सुप्रीम कोर्टाने संविधान दिनाच्या दिलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावाची निवड झाल्यानंतर शरद पवार, सोनिया गांधी यांचे आभार मानले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आपण तीन विचारधारेचे पक्ष एकमेकांवर विश्वास ठेवून देशाला वेगळी दिशा देत आहोत. तीस वर्ष ज्यांच्यासोबत मैत्री ठेवली त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र तीस वर्षांपासून ज्यांच्याशी लढत होतो त्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. मातोश्रीवर येऊन खोटे बोलणाऱ्यांना मी माफ करणार नाही असे म्हणते त्यांनी भाजपला टोला लगावला. दरम्यान, सरकार स्थापन झाल्यानंतर मोठ्या भावाला दिल्लीत जाणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
राज्यपालांनी दावा मान्य केल्यास, 1 डिसेंबर रोजी होणार शपथविधी - नवाब मलिक
उद्धव ठाकरे यांची एकमताने मुख्यमंत्रिपदाच्या नावासाठी निवड झाली आहे. ते नक्कीच मुख्यमंत्री होतील. आता ते राजभवनला जाऊन सरकार स्थापनेचा आपला दावा कररणार आहेत. राज्यपालांनी हा दावा मान्य केल्यास, 1 डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथे सायंकाळी उद्धव ठाकरेंचा तसेच मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याचे नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ठाकरे घराण्याला मिळणार पहिला मुख्यमंत्री
उद्धव यांच्या रुपाने ठाकरे घराण्याला पहिला मुख्यमंत्री मिळणार आहे. आजवर राजकारणात 'रिमोट कंट्रोल'ची भूमिका निभावणाऱ्या ठाकरे घराण्याच्या हाती आता राज्याचा कारभार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.