आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ गडावर धनुष्यबाणाच्या निशाण्यावर कमळ! उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त अशीही रांगोळी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनंजय आढाव


परळी - राज्यात सत्तास्थापनेवरुन भाजपा-शिवसेनेत सुरु असलेल्या धुसपुसीच्या वातावरणात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे गोपीनाथ गडावर येत आहेत.गोपीनाथगडावर दररोज प्रसंगानुरुप फुलांची रांगोळी काढण्यात येते.साधारणपणे 'विजयी भव' अशी असणार्या या रांगोळीतुन आज धनुष्यबाणच्या निशाण्यावर कमळ असल्याचे दाखविण्यात आल्याने राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. उध्दव ठाकरे प्रथमच गोपीनाथ गडावर येत असुन समाधी दर्शनाच्या निमीत्ताने येत असले तरी येथुन ते काय राजकिय भाष्य करतात याकडे लक्ष लागले आहे.


ठाकरे व मुंडे घराण्याची राजकारणापलिकडील मैत्री सर्वश्रुत आहे.मंत्री पंकजा मुंडे या उध्दव ठाकरेंच्या मानलेल्या बहिन असल्याने त्यांनी 2014 साली बीड लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचा उमेदवारही दिला नव्हता.राज्याच्या राजकारणात शिवसेना ना.पंकजा मुंडे यांच्या पाठीशी कायम राहिली आहे.सध्या परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या पिकांची पहाणी करण्यासाठी उध्दव ठाकरे हे मराठवाडा दौर्यावर असुन नांदेड,लोहार,पुर्णा असा दौरा करुन गोपीनाथ गडावर येणार आहेत ते प्रथमच स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेणार असल्याने गोपीनाथ गडावर स्वागताची तयारी करण्यात येत आहे. स्वर्गीय मुंडे यांच्या समाधीवर दररोज फुलांची रांगोळी काढण्यात येते. निवडणुकीत 'विजयी भव' असलेली ही रांगोळी आज धनुष्यबाणाच्या निशाण्यावर कमळ दाखवत काढण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे यांच्या पराभवास भाजपातील अंतर्गत यंत्रणा कार्यरत असल्याचा आरोप मुंडे समर्थकांतुन सातत्याने होत आहे.या पार्श्वभुमीवर उध्दव ठाकरे गोपीनाथ गडावर येत असल्याने राजकिय वर्तुळात तर्क वितर्क केले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...