Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | uddhav thakre gives comment on auranhagab loksabha election result

'औरंगाबादमध्ये खरैंचा नाही तर शिवसेनेचा पराभव झालाय, त्यामुळे इथे परत भगवा फडकवणारच'- उद्धव ठाकरे

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 09, 2019, 05:15 PM IST

"औरंगाबाची चंद्रकांत खैरे यांची जागा पडणे हे आमचे दुर्दैव."

  • uddhav thakre gives comment on auranhagab loksabha election result

    जालना- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. यावेळी 'शेतकऱ्यांना जो अडवेल त्याला शिवसेना सरळ करेल' असा इशारा उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्याना दिला. जालना जिल्ह्यातील साळेगाव येथील चाराछावणीला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली, तसेच चारा छावणीतल्या पशुपालकांना अन्नधान्याचे वाटप केले. यावेळी भाषण करताना संभाजीनगरमध्ये परत एकदा भगवा फडकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


    मराठवाड्यात सध्या पिकविम्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना जो अडवेल त्याला सरळ करणार असा इशारा उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांना दिलाय. त्यासोबतच प्रकल्पाची नुसती स्वप्न दाखवून सत्तर हजार कोटी रुपये खाल्ले असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. दरम्यान संपूर्ण देशात भाजपनंतर शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्यामुळे तुमचा विश्वास आहे तोपर्यंत मी टीकाकारांना घाबरणार नाही असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.


    "संभाजीनगरमध्ये पुन्हा भगवा फडकवणार"
    औरंगाबादमध्ये शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला, यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, "औरंगाबाची चंद्रकांत खैरे यांची जागा पडणे हे आमचे दुर्दैव." त्यामुळे औरंगाबादवर पुन्हा भगवा फडकवणार असा विश्वासही यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Trending