आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Udid Pulses Facepack Will Make The Skin Look Brighter

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उडीद डाळीच्या फेसपॅकमुळे त्वचा बनेल अधिक चमकदार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

चमकदार आणि सुंदर त्वचा सर्वांनाच आवडते. पण, आपल्या त्वचेची काळजी घेणे तितके जमत नाही. सगळ्यांची वेगवेगळी कारणे असतात. त्यासाठी ब्यूटी ट्रीटमेंटच्या नावावर आपण पैसे उधळतो. पण, काही वेळानंतर त्वचा खराब होऊन जाते. पण, बऱ्याचदा आपण घरगुती उपायही वापरतो. मग आपल्या स्वयंपाकघरातही अशा काही गोष्टी आणि वस्तू असतात ज्यांचा वापर करून तुम्ही फेसपॅक करून चेहऱ्याची आणि त्वचेची काळजी घेऊ शकता. अशीच एक घरातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उडीद डाळ. उडीद डाळ ही त्वचेची जास्त काळजी घेऊ शकते. त्वचेच्या बाबतीत जर काही समस्या असतील तर उडीद डाळ वापरून तुम्ही घरच्या घरी फेसपॅक बनवा. > अर्धा कप उडीद डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याची पेस्ट बनवा. > या पेस्टमध्ये 2-2 चमचे दूध आणि तूप घालून व्यवस्थित मिक्स करा. > त्यानंतर ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा आणि कमीत कमी 30 मिनिटे तसेच ठेवा. > हलक्याशा गरम पाण्याने चेहरा धुवा. > चांगल्या परिणामांसाठी तुम्ही हा प्रयोग आठवड्यातून तीन वेळा करून पाहू शकता. नक्कीच बदल दिसून येईल.