आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Udit Narayan Is Getting Threats To Kill On The Phone, Police Has Started Investigation

उदित नारायण यांना फोनवर मिळत आहेत जीवे मारण्याच्या धमक्या, पोलिसांनी सुरु केला तपास 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : उदित नारायण यांना जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. त्यांना सलग दोन आठवड्यांपासून धमकीचे फोन येत आहेत. धमक्यांमुळे परेशान असलेल्या उदित यांनी पोलिसांना मदत मागितली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, उदितने मुंबईच्या अंबोली पोलीस स्टेशनकडे मदत मागितली आहे. 

 

पोलिसांनी तपास सुरु केला आहे... 
रिपोर्टनुसार, पोलिसांनी सध्या एफआयआर दाखल न करताच तपास सुरु केला आहे. त्यांनी त्या नंबरला ट्रेस केले आहे, ज्याने उदित यांना धमकीचे फोन येत आहेत. हे धमकीचे फोन बिहारच्या एका नंबरवरून केले जात आहेत. पोलिसांनी आपली एक टीम बिहारसाठी रवाना केली आहे.  

 

शिव्यांसह आरोपी देत आहे जीवे मारण्याची धमकी... 
पोलीस अधिकारी भरत गायकवाडने सांगितले, 'उदित नरायण यांना अनोळखी नंबरवरून दोन आठवड्यांमध्ये 3-4 वेळा फोन केला गेला. आरोपीचे नाव लक्ष्मण आहे. त्याने फोन करून उदित यांना शिव्या आणि धमकी दिली. पण पैशांची काही मागणी केली नाही. आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत. उदित नारायण यांच्या अंधेरी येथील घराबाहेर आम्ही पोलिसांची एक टीम तैनात केली आहे. तसेच एक टीम बिहारला पाठवली आहे.' 

 

3 वेळा आला धमकीचा फोन... 
पुढे अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'उदित यांना पहिला फोन सुमारे एका महिन्यापूर्वी केला होता. त्यानंतर दूसरा फोन त्यांना 17 जुलै आणि तिसरा फोन 23 जुलैला आला होता. उदित ज्या बिल्डिंगमध्ये राहतात त्याचा गार्ड बिहारचा आहे आणि काही दिवसांपूर्वी जेव्हा ती आपल्या घरी बिहारला जात होता तेव्हा रस्त्यात त्याचा फोन चोरी झाला होता. तर अंदाज लावला जात आहे की, त्याच फोनवरून उदित यांना हे फोन येत आहेत.' 

बातम्या आणखी आहेत...