आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदित नारायण यांनी केले नेहा कक्कडचे कौतुक, म्हणाले- 'लोकांना आर्थिक मदत करणे खूप मोठे काम आहे'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः या वीकेण्डला म्हणजे शनिवारी आणि रविवारी इंडियन आयडल सीझन 11 मध्ये अलका याज्ञिक आणि उदित नारायण पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. या खास भागात उदित नारायण आणि नेहा कक्कड यांच्यात एक मजेशीर चर्चा झाली. उदित नारायण यांनी नेहाला त्यांचा मुलगा आदित्यच्या नावावरुन चिडवले आणि तिचा चक्क सून म्हणून उल्लेख केला. 


यावेळी 'इंडियन आइडल सीझन 11' च्या रॉकस्टार ऋषभ चतुर्वेदीने 'पापा कहता है',  आणि 'उड जा काले कावा' या गाण्यांवर सादरीकरण केले. यानंतर उदित नारायण म्हणाले की, नेहाच्या सामाजिक कार्याबद्दल ऐकून मला खूप चांगले वाटले. जेव्हा जेव्हा नेहाला असहाय लोकांची मदत करताना पाहतो तेव्हा वाटते की, सर्वांनीच तिच्याकडून प्रेरणा घेऊन असे सामाजिक कार्य करायला हवे. उदितजी पुढे म्हणाले की, इंडियन आयडलच्या या सीझनमध्ये नेहाने बर्‍याच लोकांना आर्थिक मदत केली आहे, हे नेहाचे हृदय किती मोठे आहे हे दर्शवते.


यावर नेहा म्हणाली, "उदितजींचे हे मोठेपण आहे की, त्यांनी माझ्या या कार्याचे कौतुक केले आहे, परंतु वैयक्तिकरित्या मला असे वाटते की, जर मी कोणत्याही प्रकारे कोणत्याही गरजू व्यक्तीस मदत केली तर ती व्यक्तीच आनंदी होणार नाही तर मलादेखील समाधान मिळेल. गरजूंना माझ्याकडून मदतीचा हात मिळावा, यासाठी मी कायमच प्रयत्न करत असते."

बातम्या आणखी आहेत...