आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एक भाऊ विरोधात गेला म्हणून काय झालं? हा भाऊ तुमच्यासोबत आहे', परळीतील सभेत उदयनराजेंचा हल्लाबोल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- "तुमचा एक भाऊ विरोधात गेला म्हणून काय  हा भाऊ तुमच्यासोबत आहे," उदयनराजेंनी महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ परळीतील सभेत विधान काढले. पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी राज्यापासून केंद्रापर्यंतचे मंत्री हजेरी लावत आहेत. त्यातच उदयनराजे भोसले यांनीही पंकजा मुंडेंचा परळीत प्रचार केला. यावेळी त्यांनी विधानपरीषदेचे विरोधीपक्ष नेते आणि परळीतील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यावर वार केला. "मी पंकजा मुंडे यांच्या विजयासाठीच आलो आहे, मी असाच परत जाणार नाही", असेही उदयनराजेंनी म्हणाले.
परळीतील सभेत उदयनराजेंनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "पंकजा मुंडे माझ्या बहिण आहेत. माझ्या बहिणीने गोपीनाथ मुंडेंना शोभेल असे काम केले आहे. एक भाऊ विरोधात गेला म्हणून काय झालं, हा भाऊ तुमच्यासोबत आहे. मी माझ्या बहिणींची पाठराखण करणार आहे. मी पंकजा मुंडे यांच्या विजयासाठीच आलो आहे, मी असाच परत जाणार नाही. गोपीनाथ मुंडेंना धोका देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या. अशा लोकांना आडवा आणि त्यांची जिरवा." अशा शब्दात त्यांनी विरोधक आणि धनंजय मुंडेंना टोला लगावला.