आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२९ सप्टेंबर 'सर्जिकल स्ट्राइक डे' म्हणून साजरा करण्याचे आदेश; यूजीसीचे परिपत्रक जारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आपल्या अधिकार कक्षेत येणाऱ्या विद्यापीठांना गुरुवारी परिपत्रक जारी केले आहे. देशभरातील उच्च शिक्षण संस्थांनी २९ सप्टेंबर रोजी 'सर्जिकल स्ट्राइक डे' साजरा करावा, असे या परिपत्रकात म्हटले आहे. या दिवसाचे आैचित्य साधून देशभरातील उच्च शिक्षण संस्थांनी सैन्याच्या कार्यशैलीविषयी विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता वाढवणे अपेक्षित आहे. 


निवृत्त सैनिक, जवानांनी देशासाठी दिलेले बलिदान तसेच विशेष संचलनाचे आयोजन विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांनी करावे. देशाच्या सैन्यदलाचे मनोबल वाढवण्यासाठी शुभेच्छा पत्रे पाठवण्याचा उपक्रम यानिमित्त हाती घ्यावा, असे यूजीसीच्या परिपत्रकात म्हटले आहे. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांतील एनसीसी कॅडेट्सचे विशेष संचलन यानिमित्त आयोजित करावे. माजी सैनिकांशी विद्यार्थ्यांचे चर्चासत्र आयोजित केल्यास सैन्याविषयी जाणिवा विद्यार्थ्यांमध्ये प्रगल्भ होतील, असे सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. दहशतवाद्यांवर नियंत्रणासाठी लष्कराने राबवली होती. जवानांच्या कामगिरीची आेळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी हे आदेश आहेत. 


इंडिया गेटवर विशेष प्रदर्शनाचे आयोजन 
२९ सप्टेंबर रोजी दिल्लीतील इंडिया गेट परिसरात मल्टिमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशाच प्रकारची प्रदर्शने विविध राज्यात आयोजित करण्यात येतील. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना ही प्रदर्शने पाहण्यास प्रोत्साहन द्यावे, असे यूजीसीच्या आदेशात म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी पाठवलेली पत्रे व शुभेच्छा पत्रे संरक्षण विभागाचा जनसंपर्क अधिकारी आणि प्रेस ब्युरो ऑफ इंडियाच्या वतीने विविध माध्यमांना प्रकाशित करण्यास देण्यात येतील. 

बातम्या आणखी आहेत...