आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • UIDAI Strictly Warns People Against Plastic Laminated Aadhaar Cards

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॅमिनेशन केलेले आधारकार्ड वापरणारे व्हा सावध; 'UIDAI'ने दिली चेतावनी, चोरी होवू शकतो तुमचा डेटा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही लॅमिनेशन केलेले आधार कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जर तुम्ही आधार कार्डला लॅमिनेशन केले असेल तर आताच सावध व्हा. कारण आधारकार्ड लॅमिनेशन केल्यामुळे कार्डवरील 'क्युआर' कोड काम करणे बंद होते. त्यामुळे तुमची वैयक्तीक माहिती चोरी होवू शकते. युनिक आयडेंटीफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI)ने सांगितल्यानुसार लॅमिनेशन केलेल्या आधार कार्डचा वापर केल्यामुळे डेटा लीक होण्याचा धोका जास्त असतो.

 

सामान्य पेपरवर करा आधार कार्ड डाउनलोड
'UIDAI'ने सांगितल्यानुसार, लॅमिनेशन केलेल्या आधारकार्डपेक्षा साधारण पेपरवरील आधारकार्ड अधिक सुरक्षित आहे. तज्ज्ञांनी  सांगितल्यानुसार, आधारकार्ड लॅमिनेशन केल्यामुळे त्यावरील क्विक रिस्पॉन्स कोड बंद पडतो. त्यामुळेच आधारकार्डला लॅमिनेशन करणे टाळावे.   

 

लॅमिनेशन असलेले आधारकार्ड वापरणे वायफळ: पांडे
'UIDAI'चे सीईओ अजय भुषण पांडे यांनी सांगितल्यानुसार, लॅमिनेशन केलेल्या आधारकार्डचा वापर हा गैर असून व्यर्थ आहे. सामान्य पेपरवर डाउनलोड केलेले आधारकार्ड किंवा मोबाइल आधार कार्ड पूर्णपणे व्हॅलिड आहे.