Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Ujani dam water level at 90 percent

उजनी धरणातील पाणी पातळी ९० टक्क्यांवर; हळूहळू शंभरीकडे वाटचाल

प्रतिनिधी | Update - Aug 25, 2018, 10:33 AM IST

भीमा खोऱ्यातील पाऊस थांबल्याने उजनी धरणाच्या दौंड येथील विसर्गात घट होऊ लागली आहे. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता ४० हजार क

  • Ujani dam water level at 90 percent

    टेंभुर्णी- भीमा खोऱ्यातील पाऊस थांबल्याने उजनी धरणाच्या दौंड येथील विसर्गात घट होऊ लागली आहे. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता ४० हजार क्युसेक विसर्ग होता. उजनी धरणातील पाणी पातळी ९० टक्के झाली आहे. १११ टक्के क्षमता असलेले धरण हळूहळू शंभरीकडे वाटचाल करू लागल्याने सोलापूर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न वर्षभरासाठी तरी मिटला आहे. आणखी दीड महिना पावसाळा शिल्लक आहे. उजनी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर वरून येणारे पाणी भीमा नदीद्वारे सोडून द्यावे लागणार आहे. या पाण्याद्वारे लघु व मध्यम प्रकल्प तसेच पाझर तलाव भरून घेण्याची मागणी होत आहे.


    मागील तीन दिवसापूर्वी दौंड येथून ६० हजार क्युसेक विसर्गाने पाणी उजनी धरणात मिसळत होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून भीमा खोऱ्यातील पाऊस थांबल्याने या विसर्गात घट होऊ लागली आहे. सध्या उजनी धरणात एकूण १११.७७ टीएमसी पाणीसाठा झाला असून, ४८.११ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

Trending