आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ujjain News: 14 Junior Resident Doctors Alleged Blood Bank Incharge Dr Roopam Jain

\'सर नेहमी अश्लील बोलतात, रात्री-बेरात्री हिडीस मेसेजेस पाठवतात\', मेडिकलच्या 14 विद्यार्थिनींचा डॉक्टरवर गंभीर आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उज्जैन- आरडी गार्डी मेडिकल कॉलेज येथील पॅथॉलॉजी विभागातील 14 ज्युनियर निवासी (विद्यार्थिनी) डॉक्टरांनी ब्लड बँक इन्चार्ज डॉ. रूपम जैन यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप लावला आहे .विद्यार्थिनी म्हणतात डॉ. जैन हे नेहमी अश्लील कॉमेंट्स करत असतात. तशी ऑडिओ रेकॉर्डिंगदेखील त्यांनी एचओडी डॉ. मंजू पुरोहित आणि डायरेक्टर डॉ. व्ही. के. महाडिक यांना दिली आहे.

 

मुली म्हणतात, आम्हाला वारंवार स्पर्श करत असतात डॉ. जैन... 
- विद्यार्थिनींनी आरोप केले की, रात्री-अपरात्री डॉ. जैन आम्हाला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवत असतात. एवढ्या रात्री कोणाशी चॅटिंग करतेस, डीपी छान आहे. छान दिसतेस, डार्लिंग असेदेखील म्हणतात आणि कधी-कधी तर हातातील मोबाइल हिसकावून म्हणतात- बघू, तू रोज कोणाशी बोलतेस?

-  मोबाइलमध्ये पॉर्न व्हिडिओ आहेत का? अशी विचारणाही करतात. विद्यार्थिनींनी कसे कपडे परिधान केले, ते फिट आहेत की नाही, यावरदेखील कॉमेंट करत असतात. वारंवार स्पर्शदेखील करतात. काम आटोपल्यावरही तासंतास विनाकारण बसवून ठेवतात आणि अश्लील चर्चा करतात. जर एखादी मुलगी म्हणाली, सर आम्हाला आशा गोष्टींवर बोलणे पसंत नाही, तर डॉ. जैन म्हणतात- मला तर असेच बोलायला आवडते.

  

असे आहेत काही आरोप
एका विद्यार्थिनीने सांगितले, डॉ. जैन यांच्या अशा वागण्याने आम्ही सर्व त्रस्त झालो आहोत. यामुळेच आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हे पाऊल उचलले आहे. विद्यार्थिनी सांगतात की, डॉ. जैन नेहमी म्हणत असतात- मी मंत्र्यांचा नातेवाईक आहे. कुणाकडेही तक्रार करा मला काही फरक पडत नाही. विद्यार्थिनींनी जी रेकॉर्डिंग दिली आहे, त्यात डॉ. जैन एका विद्यार्थिनीला असे म्हणतात की, जोपर्यंत तू हो म्हणणार नाही तोपर्यंत मी तुला स्पर्श करणार नाही.  

 

काय म्हणतात डॉ.  जैन... 
विद्यार्थिनींच्या गंभीर आरोपानंतर मेडिकल कॉलेजचे ब्लड बँक इन्चार्ज डॉ. रूपम जैन यांनी सांगितले, मी शिस्तप्रिय माणूस आहे. शिस्तीबाबत असणाऱ्या कठोर धोरणांमुळे विद्यार्थिनी माझ्यावर अशा प्रकारचे आरोप लावत आहेत. कधी-कधी मी त्यांच्याशी दिलखुलासपणे वागतो याचा अर्थ मी त्यांची छेड काढतो, असा होत नाही.

 

बातम्या आणखी आहेत...