आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • UK Army Seeks Phone Zombies And Selfie Addicts Releases World War 1 Design Posters

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मार्टफोनचे व्यसन असणाऱ्यांना सरकारी नोकरीची संधी; सतत गेम खेळणाऱ्या, चिड-चिड करणाऱ्यांना प्राधान्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - स्मार्टफोन अॅडिक्ट आणि नेहमीच मोबाईलमध्ये डोके घालून बसणाऱ्यांना रिकामटेकडे म्हणण्यापूर्वी आता विचार करावा लागेल. अशाच लोकांकडे चक्क खासगी नव्हे, तर चक्क केंद्र सरकारची नोकरी चालून आली आहे. त्यातही ज्या लोकांना सेल्फी घेण्याचा छंद आहे त्यांना प्राधान्य दिले जात आहे. इतर पात्रतांमध्ये सतत मोबाईलवर गेम खेळत असणारे आणि छोट्या-छोट्या गोष्टींवर चिड-चिड करणाऱ्यांना यात प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी मोठ-मोठे पोस्टर सुद्धा लावण्यात आले आहेत. त्यामध्ये जाहिरातीचा संपूर्ण तपशील देण्यात आला आहे.


ब्रिटिश आर्मीने दिली जाहिरात
ब्रिटिश आर्मीने आपल्या विभागात युवकांना आकर्षित करण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीप्रमाणे, लष्कराला सतत मोबाईलमध्ये व्यस्त राहणारे, मोबाईल गेम खेळत बसणारे आणि सेल्फीचा छंद असलेले युवक हवे आहेत. पहिल्या महायुद्धाच्या वेळी भरतीसाठी जशा स्वरुपाचे पोस्टर लावण्यात आले होते, त्याच स्टाइलचे पोस्टर ठिक-ठिकाणी लावण्यात आले आहेत. महायुद्धाच्या काळात अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांनी युअर कंट्री नीड्स यू (अर्थात तुमच्या देशाला तुमची गरज आहे) अशा जाहिराती लावल्या होत्या. यासाठी मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आली होती. भांडखोर आणि चिडणाऱ्या युवकांना त्यामध्ये प्राधान्य दिले जात होते. त्यावेळी अशा जाहिराती खूप यशस्वी ठरल्या होत्या. 2019 च्या सैन्य भरतीसाठी लावलेल्या पोस्टरमध्ये जुने छंद हटवून त्या ठिकाणी मोबाईल अॅडिक्ट आणि इतर पात्रता जोडण्यात आल्या आहेत. अशा लोकांना आर्मीने फोन झॉम्बी असे म्हटले आहे.


युवकांना स्वतःच्या टॅलेन्टची किंमत नाही...
ब्रिटिश लष्कराचे अधिकारी या जाहिरातीवर बोलताना म्हणाले, की आजकालच्या युवकांना स्वतःच्या टॅलेन्टची किंमत नाही. युवकांमध्ये कुठल्याही प्रकारची प्रेरणा दिसत नाही. त्यांच्यात महत्वाकांक्षा राहिलेल्या नाहीत. स्वतःमध्ये छुपे टॅलेन्ट कळत नसल्याने ते मोबाईल किंवा इतर कामांमध्ये गुंतून आहेत. त्यांना काही चांगले करण्याची प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अशा जाहिराती देण्यात आल्या आहेत. महायुद्धात यशस्वी ठरलेल्या जाहिरातींना आज सुद्धा तसाच प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा ब्रिटिश लष्कराला आहे.