आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणास ब्रिटनच्या गृहमंत्रालयाची मंजुरी, निर्णयाविरोधात करणार अपील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनने हजारो कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी फरार असलेल्या विजय माल्याच्या भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी दिली. ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जाविद यांनी माल्ल्या प्रत्यार्पणास सोमवारी मंजुरी देणाऱ्या कागदपत्रांवर औपचारिक स्वाक्षरी केली. लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने 10 डिसेंबर रोजी माल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. तसेच न्यायालयाने हे प्रकरण ब्रिटन सरकारकडे पाठवले होते. यावर रात्री उशीरा ट्वीट करताना माल्ल्याने निर्णयाच्या विरोधात अपील करणार असे सांगितले आहे. माल्ल्याकडे यासाठी 14 दिवसांचा वेळ आहे. तो लंडनच्या हायकोर्टात सुद्धा अपील करू शकतो.

 

After the decision was handed down on December 10,2018 by the Westminster Magistrates Court, I stated my intention to appeal. I could not initiate the appeal process before a decision by the Home Secretary. Now I will initiate the appeal process.

— Vijay Mallya (@TheVijayMallya) February 4, 2019

 


केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी ट्वीट करून सरकारची पाठ थोपटली. सोबतच, विरोधी पक्षांवर सुद्धा खरपूस टीका केली. त्यांनी लिहिले, की "माल्याच्या प्रत्यार्पणाचा आणखी एक मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे, विरोधी पक्ष शारदा चिटफंड घोटाळेबाजांसाठी सभा भरवत आहेत."

 

Modi Government clears one more step to get Mallya extradited while Opposition rallies around the Saradha Scamsters.

— Arun Jaitley (@arunjaitley) February 4, 2019

 


माल्ल्यावर भारतातील बँकांकडून 9,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्याने कर्जाची रक्कम न फेडता मार्च 2016 मध्ये लंडनला पळ काढला. भारताने गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या विरोधात प्रत्यार्पणाचे अपील केले होते. भारतात त्याच्या विरोधात पैशांचा घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत. एप्रिल 2017 मध्ये स्कॉटलंड न्यायालयाने याच प्रकरणात माल्ल्याला अटक केली. त्यानंतर तो जामीनावर सुटला. गेल्या दोन वर्षांपूसन त्याच्या प्रत्यार्पणासाठी लंडनच्या न्यायालयात खटला सुरू होता. 10 डिसेंबर 2018 रोजी कोर्टाने यासंदर्भात निकाल देत माल्ल्याला भारतात पाठवण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...