Home | International | Other Country | uk school girl, win world championship

या गोरी पोरीचा नाद करु नका

agency | Update - May 29, 2011, 01:17 PM IST

ती इंग्लडमधील सर्वांत ताकतवान शाळकरी मुलगी आहे. शशर असे तिचे नाव असून ती फक्त १४ वर्षाची आहे, मात्र ती आपल्या दोन शिक्षक उचलतील तेवढे वजन एकटीच आपल्या खांद्यावर उचलू शकते.

  • uk school girl, win world championship

    landan_250लंडन- ती इंग्लडमधील सर्वांत ताकतवान शाळकरी मुलगी आहे. शशर असे तिचे नाव असून ती फक्त १४ वर्षाची आहे, मात्र ती आपल्या दोन शिक्षक उचलतील तेवढे वजन एकटीच आपल्या खांद्यावर उचलू शकते. शशरने केवळ यासाठी १८ महिन्याचे प्रशिक्षण घेतले असून तिने युरोपीय पावर लिफ्टिंगमध्ये चैंपयिन बनण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याबरोबरच आपल्या वयोगटात तिने चार नवे विश्वविक्रम केले आहेत. त्यामुळे २१६ मध्ये होणारय़ा ऑलिपिंक स्पर्धेत सुवर्णपदकाची दावेदार आतापासून मानली जात आहे.डेवनमधील न्यूटन हेबट येथे राहणारी शशर हेड हिच्या जन्माची कथा जरा वेगळीच आहे. ती प्री-मॅच्युयर बेबी असून तिचा जन्म १३ आठवडे पहिले झाला. जन्माच्या वेळी तिचे वजन केवळ २.१ पौंड होते. म्हणजे फक्त सव्वा किलो. तिची आई लिलैश याबाबत सांगते की, शशरचा जन्म लवकर झाल्याने तिला महिनाभर स्पेशल बेबी केयर युनिटमध्ये ठेवली होती. त्यानंतर डॉक्टरांनी मी पुन्हा कधीच आई होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे शशर आमच्यासाठी एक चमत्कारिक मुलगी ठरली.मेहनतीच फळ मिळालं- शशरने दीड वर्षासाठी आपले शरीर व खांदे मजबूत करण्यासाठी जिम जॉईन केली होती. यावेळी तिची मेहनत व जिद्द पाहून तिच्या ट्रेेनर्सने तिला पावर लिफ्टिंंगमध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला. ती या क्रीडाप्रकारात कायमच पुढे राहिली. शशर एवढी ताकतवान असूनही अतिशय शांत व संयमी आहे. ती म्हणते, मला मिळालेल्या ताकदीचा मला खूप अभिमान आहे. दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर मी ग्लास्को येथे होणारय़ा वल्र्ड चैम्पिंयन स्पर्धेसाठी तयारी करणार आहे.Trending