Home | International | Other Country | Ukraine elects comedian who plays prez as president in 2019 elections

राष्ट्राध्यक्षांची भूमिका साकारून लोकांना पोट धरून हसायला लावणारा कॉमेडियन खरंच बनला राष्ट्राध्यक्ष

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 22, 2019, 11:10 AM IST

विशेष म्हणजे, या ठिकाणी मावळते राष्ट्राध्यक्ष एक चॉकलेट सम्राट होते

 • Ukraine elects comedian who plays prez as president in 2019 elections

  कीव्ह - मतदारांना आकर्षित करणे ही एक कला असल्याचे एका कॉमेडियनने सिद्ध केले आहे. तो नगरसेवक आमदार किंवा खासदार नव्हे तर चक्क राष्ट्राध्यक्ष पदी निवडून आला आहे. आम्ही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीबद्दल बोलत आहोत. या ठिकाणी झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत वोलोदिमीर झेलेंस्की यांनी एकूण मतांपैकी तब्बल 73.19 टक्के मते मिळवली आहेत. त्यांचे सर्वात जवळचे प्रतिस्पर्धी आणि मावळते राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेंको यांनी फक्त 24.48 टक्के मते मिळवली आहेत.


  राष्ट्राध्यक्षांची भूमिका साकारली अन खरोखर बनले...
  - गेल्या काही वर्षांत युक्रेनमध्ये सर्व्हेंट ऑफ द पीपल नावाचे नाटक खूप लोकप्रीय झाले. त्याच नाटकामध्ये वोलोदिमीर झेलेंस्की यांनी मुख्य भूमिका साकारली होती. झेलेंस्कींना एक शिक्षकाची भूमिका देण्यात आली. हा शिक्षक सरकारच्या भ्रष्ट कारभारावर सोशल मीडियावर आपली भूमिका मांडतो. त्याची ही पोस्ट देशभर इतकी व्हायरल होते की तो अपघाताने चक्क राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून येतो.
  - झेलेंस्की यांनी साकारलेली राष्ट्राध्यक्षाची भूमिका लोकांना खूप आवडली. देशवासियांना हसायला लावणाऱ्या या कॉमेडियनने गंमत म्हणून राजकारणात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. नाटकात ज्या नावाने त्याचा राजकीय पक्ष होता, त्याच नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना करून निवडणुकीचा प्रचार सुरू केला. कॉमेडियनची ही आयडिया तुफान यशस्वी ठरली. देशात पुन्हा शांतता प्रस्थापित करणे आणि फुटिरतावादी तसेच रशिया समर्थकांसोबत शांतता चर्चा करणे हे आपले प्राधान्य राहणार असे झेलेंस्की यांनी सांगितले आहे.

  सत्तापालटानंतर निवडून आले होते चॉकलेट किंग
  2014 मध्ये युक्रेनने राजकीय भूकंप अनुभवला. रशिया समर्थक राष्ट्राध्यक्ष विक्टर यानुकोविच यांची सत्ता युरोपियन संघ आणि अमेरिकेने उलथून लावली. यानंतर रशियाने गुप्तहेरांच्या मदतीने विक्टर यांना सुखरूप रशियात बोलावून शरण दिली. त्यावेळी झालेल्या रशियाच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत अब्जाधीश चॉकटेल व्यापारी पेट्रो पोरोशेंको निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीचे निकाल पाहता पेट्रो पोरोशेंको यांनी आपला पराभव मान्य केला आहे.

Trending