Home | Divya Marathi Special | 'Ullu ka pattha' novel comes in limelight

चौकीदार-चोर आणि चमचेगिरी: राजकारणावर गमतीशीर व्यंग करणारी कादंबरी 'उल्लू का पठ्ठा' चर्चेमध्ये

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 04, 2019, 01:07 PM IST

कादंबरीमध्ये ''मैं भी चौकीदार'' आणि ''चौकीदार चोर है'' अशा गोष्टींचा समावेश

 • 'Ullu ka pattha' novel comes in limelight

  भोपाळ- अमिताभ बुधौलिया यांची निवडणुकीच्या काळात प्रकाशित झालेली कादंबरी ''उल्लू का पठ्ठा'' सध्या खूप चर्चेत आहे. ही कादंबरी, सत्ता मिळवण्यासाठी राजकारणी काय आश्वासने देतात, त्याची कथा या कादंबरीत आहे. असे म्हटले जाते की, ही कादंबरी पुर्वनियोजित होती त्यामुळेच आचार संहिता लागू झाल्यानंतर प्रकाशित केली आहे. कादंबरीमध्ये ''मैं भी चौकीदार'' आणि ''चौकीदार चोर है'' अशा गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. ही कादंबरी एक हास्य व्यंग असून, आंतरराष्ट्रीय प्रकाशन नोशनप्रेसने या कादंबरीला प्रकाशित केले आहे.


  अमिताभ यांची तीन महीन्यामधील ही दुसरी कादंबरी प्रकाशित झाली आहे. पहिली कादंबरी ''सत्ता परिवर्तन'' जोरदार चर्चेत आहे. यावर एका चित्रपटाची निर्मितीसुध्दा झाली होती, पण काही कारणास्तव तो चित्रपट अपुर्ण राहीला. मध्यप्रदेश, छत्तीसगड, आणि राजस्थानमधल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली होती. या तिनही राज्यांमध्ये सत्ता परिवर्तन झाले, त्यामुळेच या कादंबरीचे शिर्षक चर्चेत आले होते.


  'सत्ता परिवर्तन राजकारण आणि गुन्हेगारी या विषयांवर आधारीत ही कादंबरी आहे. यातील मुख्य पात्र कुंडाचे बाहुबली आमदार रघूराज प्रताप सिंह उर्फ भैय्या राजा यांना हुबेहूब मिळते जुळते आहे, त्यामुळेच ही कादंबरी वादात सापडली आहे. ''उल्लु का पठ्ठा''मध्ये निवडणूक प्रक्रिया आणि खासकरूण राजकारणातील वंश परंपरेवर व्यंग केले आहे. कादंबरीमध्ये बुंदेली भाषेचा वापर केला आहे. अमिताभ म्हणतात, ही कादंबरी राजकारणातील वास्तविकता मांडण्याचे काम करते. राजकारणी कशा प्रकारे निवडणूका लढवतात, मतदारांना भुरळ घालतात हेच दाखवण्यात आले आहे. या कादंबरीवर चित्रपट बनवण्याची तयारी सुरू आहे. अमिताभ सांगतात- सुरूवातीला त्यांनी या विषयावर पटकथा तयार केली होती, नंतर त्यांना वाटले की, ही कादंबरी चित्रपटाच्या आधी लोकापर्यंत पोहचायला हवी, त्यासाठी त्यांनी भोपाळमध्ये एक नाटक बसवले. हे नाटक लोकांना आवडले आणि त्यानंतर त्यांनी कादंबरी लिहण्यास सुरूवात केली.


  ही कादंबरी आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे, या कादंबरीतून होणारी कमाई कुपोषित बालकांवर खर्च होणार असल्याचे अमिताभ यांनी सांगितले आहे. यासाठी एक स्वयंसेवी संघटना ''विकास संवाद'' मदतीसाठी पुढे आली आहे. अमिताभ म्हणतात- आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे. आम्हाला आशा आहे की, ही कादंबरी लोकांना आवडेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल. विकास संवाद या कामाला पुढे घेऊन जात आहेत, ही एक चांगली गोष्ट आहे. आम्ही जर कुपोषित बालकांसाठी काही काम करू शकलो तर माझं कादंबरी लिहणं सार्थक होईल.

  कादंबरीवर चित्रपट-साहीत्य आणि पत्रकारीता क्षेत्रातील मान्यवर लोकांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ''जाने भी दो यारो'' चित्रपटाचे लेखक रंजीत कपुर यांनी ''उल्लु का पठ्ठामध्ये राजकारनातील अकार्यक्षम असलेल्या नेत्यांना रंजक प्रकारे मांडले आहे'', असे मत व्यक्त केले आहे. प्रसिध्द कवी मदनमोहन समर म्हणतात- ''उल्लु का पठ्ठा हास्य-व्यंग काव्यशैलीच्या चालीवर रचले आहे.'' प्रसिध्द साहित्यिक प्रिता व्यास लिहतात- "'उल्लु का पठ्ठा सोप्या भाषेत असामान्य जीवनाचे सत्य मांडणारे जिवंत चित्रण आहे.''

  व्यंगकार अनुज खरे म्हणतात - ''लोकशाहीमध्ये कोण-कोणाला मुर्ख बनवतो, उल्लु का पठ्ठा मध्ये हेच पाहायला मिळते.'' चित्रपट गीतकार आणि गझलकार विजय अकेला यांनी प्रतिक्रिया दिली- ''उल्लु का पठ्ठा भारतीय राजकारणाचा आरसा आहे.'' चित्रपट निर्माता राजकुमार भान यांनी आपले मत व्यक्त केले- ''उल्लु का पठ्ठा वाचत असताना प्रत्येक पात्र-दृश्य डोळ्यांसमोर जीवंत स्वरूपात दिसतात.'' अभिनेता राजीव वर्मा लिहतात- ''उल्लु का पठ्ठा राजकारणातील वंशवादाला चित्रपटाच्या शैलीत प्रस्तुत करते.'' चित्रपट लेखक व निर्देशक राज शांडिल्य म्हणतात- ''उल्लु का पठ्ठा वाचत असताना असं वाटतं जणु आपण एखादा चित्रपट पाहतो आहोत.'' पत्रकार के.के. उपाध्याय म्हणतात- ''उल्लु का पठ्ठा लोकशाही अव्यवस्थेवर जोरदार व्यंग आहे.''

  अमिताभ यांनी सांगितले - चित्रपटकारांनी दोन्ही कादंबरीमध्ये रूची दाखवली. जर याचे हक्क विकले गेले तर त्यातून येणारा पैसारदेखील कुपोषित बालकांवर खर्च करण्यात येईल. उल्लु का पठ्ठा नोशन प्रेसद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. नोशन प्रेस व्यतीरिक्त अमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादींवर याची ऑनलाईन विक्री सुरू आहे.

Trending