आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Ulta Paani,'water Flows From The Bottom To The Top, There Are 64 Such Places In The World And 5 In India

मॅनपाटमध्ये उतारावरुन चढाकडे वाहते पाणी, जगभरात अशा 64 तर देशात 5 जागा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड(छत्तीसगड)- मॅनपाट छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यातील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. याला छत्तीसगडचा शिमला म्हटले जाते. येथेच पर्यटकांना आकर्षित करणारी एक जागा 'उल्टा पानी' आहे. येथे पाणी खालच्या बाजुने वरच्या बाजुकडे वाहत जाते. येथे रस्त्यावर उभी असलेली न्यूट्रल गाडी 110 मीटरपर्यंत डोंगरावर चढत जाते.

 

मॅनपाटच्या या जागेवर गुरुत्वाकर्षणापेक्षा मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे, जी पाणी किंवा गाड्यांना वरच्या बाजुला नेते. शास्त्रज्ञांनी सांगितले की, जगभरात अशा 64 आणि देशात अशा 5 जागा आहेत.

 

हा एक शोधाचा विषय
भौतिकशास्त्राचे प्राध्यापक एके पाणिग्रही यांनी सांगितले की, "पाणी वरच्या बाजुने तेव्हाच जाते, जेव्हा त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षणापेक्षा जास्त प्रभावी शक्ती असेल. हीच शक्ती पाणी किंवा गाड्यांना वर ओढते. उल्टा पाणी या जागेवर अनेक अशा शक्ती असू शकतात, ज्यामुळे पाणी वर जाते. हा एक शोधाचा विषय आहे." 


सुरुवातील लोक या जागेला भुताटकी मानायचे
मॅनपाटचे पर्यटन अधिकारी सुरेंद्र वर्मा यांनी सांगितले की, "काही वर्षांपर्यत लोक या जागेला आणि या प्रकाराला भुताटकी समजायचे. पर्यटन विभागाच्या प्रचारानंतर लोकांमध्ये जागरुकता आली आणि येथे पर्यटकांची संख्या वाढली."

 

भारतातील पाच जागा
लेह- लद्दाख 
तुलसी श्याम अमरेली- गुजरात 
कालो डुंगर कच्छ- गुजरात 
जोगेश्वरी विकरौली लिंक रोड- मुंबई 
उल्टापानी, मॅनपाट- छत्तीसगड 

बातम्या आणखी आहेत...